पाणी समस्येवर पालिका टँकरवर तर सेना नगरसेवक भाजपवर “निर्भर”, पाणी समस्या फक्त भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच आहे का नगरसेवक देशमुख यांचा सवाल

0
95
Advertisements

चंद्रपूर – मागच्या वर्षी सारखा पाणी प्रश्न यावर्षी सुद्धा शहरात उदभवला आहे, नेहमीप्रमाणे पालिकेने शहरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नावर अजूनही उचित नियोजन केले नाही.
पाणी प्रश्नावर कुणी ओरडले तर उत्तर मात्र एकचं अमृत योजना सुरू होणार आहे पाणी प्रश्न मिटेल असे उत्तर सत्ताधारी नागरिकांना देत आहे.
देशात, राज्यात आज लॉकडाउनची परिस्थिती असताना सुद्धा पालिका पाणी प्रश्नावर मात्र अजूनही तोडगा काढत नाही आहे.
काही प्रभागात 2 ते 3 दिवस आड पाणीपुरवठा होत आहे त्यावर पालिकेच दुर्लक्षचं आहे.
महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पालिकेने भाजप नगरसेवकांची पालिका सभागृहात पाणी प्रश्नावर बैठक घेतली मात्र पाणी समस्या ही फक्त भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच आहे का? असा प्रश्न विरोधी पक्षातील गटनेते पप्पू देशमुख यांनी विचारला.
बैठकित भाजप नगरसेवक सह शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक उपस्थित होते हे विशेष.
राज्यात भाजपला बाजूला करून 25 वर्षाची युती तोडत कांग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली असताना मात्र चंद्रपुरातील हे 2 नगरसेवक नेहमीसारखे भाजपच्या बाजूला आहे.
सध्या शहरातील पाणी प्रश्न टँकर द्वारे निराकरण करीत आहे अशी माहिती महापौर राखी कंचार्लावार या देत आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका पाणी टँकरवर तर सेना नगरसेवक भाजप वर निर्भर आहे असे दिसून येत आहे.

सेनेच्या दोन्ही नगरसेवकांवर पक्षाद्वारे लवकर कारवाई करण्यात येणार आहे असे शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here