प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्गुस – कोरोना विषाणू संदर्भात संपूर्ण जगभर लाँकडाऊन ची स्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. उद्योग धंदे, व्यापार, व्यवसाय ठप्प झाल्यामुळे मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. घुग्घूस येथील लाँयड्स मेटल कंपनी गेल्या दोन महिण्यापासून लाँकडाऊन मुळे बंद असल्याने तेथील कामगारांवर उपासमारीची वेळ आली, दोन महिण्यापासून कंपनी प्रशासनाने पगार दिला नसल्याने त्यांना आर्थिक अडचण येत असल्याने या कामगारांनी घुग्घूस येथील मा. आ. श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्या कामगारांची समस्या लक्षात घेऊन मा. आमदार साहेबांनी त्या लायड्स मेटल कंपनीच्या कामगारांना राशन कीट देऊन त्यांना मदत केली. यावेळी कामगारां पैकी विकास निखाडे, संघर्ष मेश्राम, सोमेश्वर गायकवाड, किशोर जुमडे, नंदू चांदेकर, व्यंकटेश कोमरकंडा, आणि इतर लाँयड्स मेटल कंपनी घुग्घूस येथील कामगार उपस्थित होते. राशन कीट चे वाटप यंग चांदा ब्रिगेड घुग्घूस च्या मा. आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या कार्यालयातून करण्यात आले.