रस्ता रोखून शेतकर्‍यांनी व्यक्त केला आक्रोश.! सीसीआय मार्फत कापूस खरेदीची मागणी, पोलिस, बाजार समिती व लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने खरेदी सुरू

0
106
Advertisements


गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
सीसीआयद्वारे कापूस खरेदी केला जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रणरणत्या उन्हात 28 मे रोजी राजूरा गोविंदपूर महामार्गावरील सोनुर्ली गावाजवळ असलेल्या जिनींग समोरच रस्ता रोखून धरल्याने वाहतुक बंद पडली होती.वाहनांच्या रांगच रांग लागल्याने वाहतूक बंद पडली होती.तात्काळ कापूस खरेदी करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला होता.
पुढील हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करायची आहे.मात्र कित्येक शेतकऱ्यांचा कापूस आजही घरात पडून आहे.सीसीआयच्या ऑनलाईन नोंदणी क्रमांक नुसार प्रतीक्षा केल्यानंतरही शेतकऱ्यांचा नंबर येत नसल्याने गरजू शेतकरी नाइलाजाने खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने कापूस विकत आहे.यामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला असून अखेर संतप्त शेतकऱ्यांत आक्रोश निर्माण झाला परिणामी रस्ता रोखण्यात आल्याची घटना घडली.पोलिस प्रशासन,बाजार समिती पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने सध्या कापूस खरेदी करण्यात येत असून बंद रस्ता खुला करून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.याच दरम्यान माजी आमदार अँड.वामनराव चटप,जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबीद अली,बिबीचे उपसरपंच प्रा.आशीष देकर व इतरांनी सदर ठिकाणी जावुन शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा विरोध केला.टोकन पद्धत बंद करून सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.आज 70 गाड्यांची कापूस खरेदी केली जात असून यासंदर्भात उद्या जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here