कोरोना काळात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन, आदीलाबाद – चंद्रपूर महामार्गावर वाहनांच्या रांगा

0
121
Advertisements

गणेश लोंढे

कोरपना – सीसीआय द्वारे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज चंद्रपूर आदिलाबाद महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन सुरू केले असून तात्काळ कापूस खरेदी करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुढील हंगामाचे दिवस समोर आले असून पेरणी करण्यासाठी बी बियाणे खरेदी करण्यासाठी तसेच काही बोहोतेक शेतकऱ्यांचा आजही पूर्ण कापूस घरातच असून सीसीआय च्या ऑनलाइन नोंदणी क्रमांक प्रमाणे प्रतीक्षा केल्यानन्तर सुद्धा शेतकऱ्यांचा नंबर येत येत नसल्याने तसेच गरजू शेतकऱ्यांना संतप्त होऊन प्रायव्हेट व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत असून शेरकरी वर्ग हवालदिल झाला आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आज गडचांदूर चन्द्रपूर आदीलाबाद मार्ग रोखून धरला असून रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याची श्यक्यता आहे.

सध्या सीसीआय माध्यमातून गाड्यांचा नंबर सुद्धा लागत नाही, कारण बाजार समितीद्वारे 15 दिवस आधीपासून ऑनलाइन नंबर लावण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या असल्या तरी अजूनही कुणाचा नंबर लागलेला नाही, याद्वारे शेतकऱ्यांचे फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे, जिनिंग द्वारे दलाल शेतकऱ्यांना आम्ही तुमचा कापूस तात्काळ विकून देऊ अशी हमी देत कमी भावात त्यांचा कापूस खरेदी करून जास्त भावात विकण्याच्या गोरखधंदा सुद्धा सुरू आहे, यावर शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.

कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालपासून शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाड्या उभ्या आहे परंतु अजूनही कुणाचा नंबर लागलेला नाही, शेतकरी यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा होत असून पुढे काय करायचं याचा प्रश्न उभा आहे.

भर उन्हात शेतकरी बाजार समिती परिसरात आहे, उन्हाची सोय आहे परंतु प्यायला पाणी नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनामुळे चंद्रपूर – आदीलाबाद मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहे, सध्या कांग्रेसचे जिल्हामहासचिव शैलेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here