या कारणाने त्या दाम्पत्याने आत्महत्या केली

0
36
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्गुस – घुग्घुस येथील महातारदेवी रोडवरील वॉर्ड क्र. 06 मधील साहनी कॉम्प्लेक्स येथे भाडयाने राहणारे देबाशीष रॉय वय 40 वर्ष, राहणार कोलकत्ता व शेषी किरण टोपे वय 32 वर्ष रा. बिलासपुर छत्तीसगढ़ यांचे शव दोन वेग – वेगळ्या खोलीमध्ये सीलिंग फैनला लटकुन आत्महत्या केल्याचे निर्दशणास आले मात्र तेथील परिस्थिति व विसंगती पाहुन हे हत्या की आत्महत्या असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
येथील कोरकंटी यांच्या निवास्थानात हे दंपत्ती मागील तीन वर्षापासून भाडयाने राहत होते.
हे दोघे बियोंड पॉवर निर्मल बैंग नावाच्या शेयर मार्केटिंग कंपनी मध्ये कार्यरत होते.
यांचे कार्यालय राजीव रतन चौक येथील असलम काम्प्लेक्स मध्ये होते.

दिनांक 27 में रोजी दुपारी 1.30 वाजता प्रवीण कोंकटी यांनी देबाशीष रॉय यांच्या मोबाईलवर कॉल केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ते उत्तर देत नाही म्हणून त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला मात्र त्यांनी ही उत्तर न दिल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष जावून दार वाजवून आवाज़ दिला मात्र दार आतून बंद होते व कुठलाच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला सूचना दिली असता पोलीस उप – निरीक्षक वीरसेन चहांदे, पी.एस. डोंगरे,यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी जावून दरवाजा तोडला असता सीलिंग फैनला लटकलेले मृतदेह निर्दर्शनास आले.
व त्यांच्या शेजारी लिखीत स्वरुपात माफीनामा मिळाला
घटनेची माहिती मिळताच उप – विभागीय पोलीस अधिकारी नांदेड़कर हे घटनास्थळी तातळीने दाखल झाले.
पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण म्हणजे कोरोना मुळे झालेले लॉकडाउन या काळात त्यांच्या शेअर मार्केट कंपनीत ग्राहकांनी पैसे लावले होते, परंतु लॉकडाउनमुळे संपूर्ण शेअर मार्केट कोसळून पडले, ग्राहकांचा पैसा त्या शेअर बाजारात बुडाला, हा मानसिक तणाव त्यांच्या मनात वारंवार त्रास देऊ लागला होता.

ग्राहकांचे पैसे कसे परत करणार हा प्रश्न त्यांच्या समोर उभा येऊन ठाकला या साठी त्या दाम्पत्यानी गळफास घेत आत्महत्या केली असा अंदाज वर्तविल्या जात आहे.

रॉय दाम्पत्यांचा प्रेमविवाह झाला होता, ते दोघेही गुण्यागोविंदाने राहत होते, आपसात कधी त्या दोघांत भांडणे झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here