गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात इतर समस्यासह सध्या पत्रकार क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पहायला मिळत आहे.याठिकाणी कॉपीपेस्ट पत्रकारांनी अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र असून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडणाऱ्या प्रामाणिक,निष्ठावान,निष्पक्ष पत्रकारांना ही मंडळी डोकेदुखी ठरत आहे.स्वता:ला पत्रकार म्हणून चारचौघांत मिरवणारे येथील काही पत्रकार निव्वळ जाहिरात व चिरीमिरीच्या नादात संबंधितांची प्रशंसा करताना दिसत आहे. स्वत:कडे व्यवस्थीत बातमी लिहिण्याची बोंब असल्याने ही मंडळी इतरांना लिहून मागतात किंवा दुसर्याच्या बातम्या कॉपी करतात.आश्चर्याची बाब म्हणजे यातील काही पत्रकार मोठमोठ्या वृत्तपत्रात काम करीत असून संबंधित वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी पण अशांची पात्रता तपासत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.जाहिराती व चिरीमिरीच्या लालसेपोटी एकच बातमी वारंवार प्रकाशित करून संबंधितांना खुश करण्याचा प्रयत्न याठिकाणी युद्धपातळीवर सुरू असून “स्वतः बातमी लिहिता येत नाही आणि म्हणे मी पत्रकार” यासाठी संबंधित विभागाने एकदा तालुका पातळीवर बातमी लिहिण्याची परिक्षा घ्यावी जेणेकरून कॉपीपेस्ट पत्रकारांचे पितळ उघडे पडतील अशी उपहासात्मक चर्चा ठिकठिकाणी वाचकांकडून ऐकायला मिळत आहे.अशा कॉपीपेस्ट पत्रकारांमुळे लोकशाहीच्या चौथा स्तंभ मानला जाणाऱ्या खऱ्या पत्रकारांची गळचेपी होत आहे हे मात्र विशेष.
अबब….! बातमी लिहिता येत नाही आणि म्हणे मी पत्रकार, कोरपना तालुक्यात कॉपीपेस्ट पत्रकारांचा भरणा अधिक, परिक्षा घेतल्यास पितळ उघडे पडतील, कित्येक वाचकांची प्रतिक्रिया
Advertisements