कॅप्सूल कंटेनर नाल्यात उलटला चालक गंभीर रित्या जखमी ; देवघाट पुलावरील घटना

0
205
Advertisements


कोरपना – आदिलाबाद कडून सिमेंट भरण्यासाठी गडचांदुर कडे जाणारा कॅप्सूल कंटेनर अनियंत्रित होऊन नाल्यात उलटला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चंद्रपुर – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील देवघाट नाला पुलावर घडली.
यात वाहन चालक योगेश चौबे (३५) रा. जोहोनपूर ( उत्तर प्रदेश) गंभीर रित्या जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार, आदिलाबाद कडून एटीसी ट्रान्सपोर्टचा टी एस ०१ यू सी ०६५५ क्रमांकाचा
सिमेंट कॅप्सूल कंटेनर सिमेंट कंपनीत गडचांदूर येथे माल भरायला जात असताना. अचानक वाहन अनियंत्रित झाल्याने व पुलाला कठडे नसल्याने नाल्यात कोसळले. यात चालकाच्या पायाला गंभीररीत्या इजा पोहचली. रस्त्यावरून येताना ही घटना प्रत्यक्षदर्शी निखिल बोबडे रा.शेरज यांना दिसताच. त्यांनी लागलीच माहिती कोरपना पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण गुरनुले, वाहतूक पोलीस कर्मचारी बन्सीलाल कुडावले, विनोद पडवाल, रमेश वाकडे, हेमंत धवणे, प्रदीप ताडाम, राजू चिताडे, भेंडेकर, इखारे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने वाहन चालकाला कसोशीने वाहनातून बाहेर काढले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते आबिद अली, विलास राऊत , सुरेश खोबरकर आदींनी सहकार्य केले. त्याला ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here