१ जून ला कोरपना येथे भव्य रक्तदान शिबिर, स्टुडंट फोरम गृप व समाजसेवक डॉ.गिरीधर काळे मित्रमंडळाचे आयोजन

0
184
Advertisements

कोरपना : प्रसिद्ध समाजसेवक डॉ. गिरीधरभाऊ काळे यांच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सोमवार १ जूनला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्टुडंट फोरम गृप व समाजसेवक डॉ.गिरीधर काळे मित्रमंडळाच्या माध्यमाने करण्यात आले आहे. कोरपना येथे वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी ९ ते दुपारी तीन पर्यंत रक्तदान शिबीर पार पडणार आहे.

समाजसेवक डॉ. गिरीधर काळे बिबी येथे मागील ३४ वर्षांपासून अस्थीरुग्णांवर निशुल्क सेवा करीत आहे. आजतागायत चार लाखांहून अधिक हाडाच्या रुग्णांवर उपचार करून त्यांनी बरे केले आहे. ग्रामसभेने त्यांना ‘डॉक्टर’ ही ऐतिहासिक उपाधी देऊन सन्मानित केले. राज्य व देशभरातील रोज शेकडो अस्थीरुग्णांवर उपचार करणारे डॉ.काळे यांनी विदेशातील रुग्णांनाही सेवा दिली आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम म्हणून दरवर्षी त्याच्या चाहत्या युवक मित्रपरिवारातर्फे रक्तदानाचे आयोजन करण्यात येते.

Advertisements

कोरोना महामारीमुळे देश लाॅकडाऊन आहे. मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त नागरिकांनी लाॅकडाऊनचे नियम पाळून उपस्थित रहावे व रक्तदान करावे असे आवाहन तालुक्यातील स्टुडंट फोरम गृपच्या सर्व शाखा सदस्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here