गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नांदा,आवारपूर परिसरात गेल्या 5 मे रोजी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आलेल्या वादळी वार्यात आवारपूर येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयावरील टिन पुर्णपणे उडाले होते.वादळ शांत झाल्यावर स्थानिक कर्मचार्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र टिन कुठेच सापडले नाही.अखेर सदर टिन चोरीलाच गेल्याचे गृहीत धरून शाळा मुख्याध्यापक नानाजी डाखरे यांनी गडचांदूर पोलिस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली.त्यानुसार सदर घटनेचा पंचनामा करून तिन जणांची संशयित म्हणून चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी गेलेले 10 टिन किंमत अंदाजे 10 हजारांचा माल जप्त करून धर्मा आत्राम, रामदास बोटाने,येडूमलाई मल्लाईकोरन नामक तीन आरोपींना कलम 379 खाली अटक करण्यात आली असून ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
शाळेच्या टिन चोरी प्रकरणी 3 आरोपींना अटक, गडचांदूर पोलिसांची कारवाई, नांदाफाटा येथील घटना
Advertisements