News 34 Live इफेक्ट, तृतीयपंथी डॉली यांच्या थेट प्रक्षेपणानंतर शिवसेना व भाजपची मदत

0
87
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा व बाहेर जिल्ह्यातील गन्मान्य व्यक्तीच्या लाईव्ह प्रसारणानंतर news34 ने तृतीयपंथी यांच्या समस्यांना लाईव्ह द्वारे वाचा फोडली.

17 मे ला माजी आमदार वामनराव चटप यांच्या लाईव्ह प्रसारण पासून सुरू झालेला हा प्रवास अजूनही सुरूच आहे,  26 मे ला तृतीयपंथी डॉली पटेल यांच्या लाईव्ह प्रसारण दरम्यान त्यांच्या समस्येवर शिवसेना व भाजपने छोटीशी मदत केली.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मनस्वी गिर्हे, युवा सेना समनव्यक निलेश बेलखेडे, शहरप्रमुख प्रमोद पाटील, राहुल विरुटकर यांच्याद्वारे डॉली पटेल यांना आर्थीक मदत करण्यात आली.

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी डॉली पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांना धान्य किट वाटप करण्यात आली.

आज news34 च्या लाईव्ह प्रसारण नंतर शिवसेना व भाजप ने डॉली पटेल व सहकार्यांना छोटीशी मदत केली आहे, शहरातील व जिल्ह्यातील दान दात्यांनी या उपेक्षित समाजाला थोडी फार मदत करा असे आवाहन news 34 ने नागरिकांना केले आहे.

आपली एक छोटीशी मदत त्यांना कामी येणार आपली मदत आपण news34 क्रमांक 9689008444 वर संपर्क साधून करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here