कोरोना योध्दात शिवसैनिक कोविड योध्दा म्हणून काम करेल – मुख्यमंत्री ठाकरे यांच्या जिल्हाप्रमुखांना सूचना

0
204
Advertisements

चंद्रपुर : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि.25 मे सोमवार रोजी दुपारी 12 ते 2 असा राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांसोबत एकाच वेळी  व्हीडीओ काॅन्फरंन्सींग द्वारे संवाद साधला.या चर्चेत राज्याचे चिफ सेक्रेटरी अजोय मेहता व शिवसेना सचिव अनिल देसाई व शिवसेनेचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांनी देखील चर्चेत सहभाग घेतला .

यापुढे कोरोना युद्धात आता शिवसैनिकांनी कोविड योद्धा म्हणून काम करावे अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली आणि चंद्रपुर चे खाजगी क्लिनिक व हॉस्पिटल उघडण्याची संबंधीत डॉक्टरांना विनंती करा त्यांना आपण पी पी ई किट , सॅनेटाईझर व मास्क इ. संरक्षक साहित्य उपलब्ध करून देऊ अशी सर्वात मोठी  घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग चर्चेत केली .

Advertisements

प्रसंगी चर्चेत सहभागी होत शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांनी सांगितले की ,चंद्रपुर मध्ये कोरोना हा 1 रुग्ण होता ग्रीन झोन मध्ये जात असताना अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने आज चंद्रपुर ची स्थिती 21 बाधीत रुग्णापर्यंत पोहोचली आहे . त्यातच बाधितांचा हा चिंताजनक आहे अधिकाऱ्यातील असमन्वयामुळे जिल्हात रुग्ण वाढत आहेत उपयोजना गरजेचे आहे.पालकमंत्री महोदय , जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी नियोजनसिकरीत आहे. मात्र महानगर,नगर पालिका,स्थनिक पातळीवर अधिकाऱ्यांत बेबनाव असल्याने कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे . त्याकरिता कारवाई अपेक्षित आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार व्हावा सी सी आय द्वारा कापूस खरेदी केंद्रावर केवळ 20 शेतकऱ्यांचा कापूस मोजला जात असल्याने हजारो शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे . या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कापूस मोजला जावा अ अशा मुख्य सूचना मांडल्या त्याचप्रमाणे शालेय,महाविद्यालय विदयार्थ्यंची यावर्षीची फी न वाढविण्याबद्दल ,पालकांना फी शुल्कामध्ये योग्य ती सूट मिळावी, त्यांना फी भरण्याकरिता अधिकची कालावधी मिळावी आणि उच्च शिक्षण विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अश्या शिक्षण विषयक विद्यार्थी, युवकांच्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांनी पक्ष प्रमुखांच्या आदेशानूसार शिवसैनिक व पदाधिकारी बुथवाईज मतदार यादी चेक करून 55 वर्षावरील नागरिकांचे स्क्रिनिंग तापसनी करतील व सक्षम कोविड योद्धा म्हणून शिवसैनिक प्रभावीपणे काम करेल असे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याप्रमाणे संवाद साधला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here