चंद्रपुरातील बाबूपेठ परिसरात बघिराला त्या युवकांनी जिवंत गाडले, मेनका गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल

0
110
Advertisements

चंद्रपूर – बाबूपेठ परिसरात 4 दिवसआधी परिसरातील कुत्र्याला 2 युवकांनी निर्ममपणे मारहाण केली इतकेच नव्हे तर त्याला अर्धमेल्या स्थितीत जिवंत गाडले.
हा संतापजनक प्रकार बाबूपेठ परिसरात घडला आहे, त्या कुत्र्याला मारहाण करणारे त्याच परिसरातील राकेश ठाकूर व भैया ठाकूर या दोन भावंडांनी त्या मुक्या जनावराला अमानुषपणे मारहाण केली.
मला त्या कुत्र्याने 2 महिन्याआधी चावा घेतला म्हणून आम्ही त्याला मारले.
या प्रकरणात प्यार फाऊंडेशन च्या सदस्यांनी पुढाकार घेत पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी पण प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांना अपमानास्पद वागणूक दिली, नंतर त्या सदस्यांनी ही माहिती मेनका गांधी यांच्याकडे पोहचवली असता त्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने पोलिसांनी त्या 2 भावंडविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
बाबूपेठ परिसरातील काही युवकांनी याबाबत माहिती दिली असता त्यांनी सांगितले की तो कुत्रा सर्व नागरिकांसोबत प्रेमाने रहायचा, रात्री अनोळखी व्यक्ती आला की तो कुणालाही परिसरात येऊ देत नव्हता, ठाकूर भावंडांचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतात अशी परिसरात नागरिकांची चर्चा आहे, ते जेव्हा पण माल उतरवत असत त्यावेळी तो कुत्रा त्यांना भुंकायचा म्हणून त्या भावंडांनी त्याला ठार केले.
परिसरातील नागरिक त्या कुत्र्याला बघिरा नावाने हाक मारत असत, आज बघिरा आपल्यात नाही म्हणून नागरिकांना दुःख होत आहे, परंतु त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्या अशी मागणी सुद्धा नागरिकांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here