News34 च्या बातमीने पालिका प्रशासन खळबळून जागे, थंड पाण्याची आरो तात्काळ दुरुस्त

0
155
Advertisements

प्रतिनिधी/सैय्यद मुमताज अली*
गडचांदूर – कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर म्हणजेच गडचांदूर, या परिसरात देशातील अग्रगण्य सिमेंट उद्योग आहे यामुळे या ठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते.
मुख्य मार्गावरील पडक्या बसस्थानकजवळ मागील वर्षी नगर परिषदेमार्फत नागरिकांना थंड पाणी प्यायला मिळावे यासाठी आरो मशीन लावण्यात आली होती.
मात्र यावर्षीच्या कोरोना संकटात तो आरो अचानक बंद पडली, 2 महिने सलग लॉकडाउन असल्याने मार्गावरची वर्दळ, बसेस या बंद होत्या, लॉकडाउन मधील काही नियम शिथिल झाल्यावर नागरिक भर उन्हात पाणी शोधू लागले.
पालिकेची थंड पाण्याची आरो बंद असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
News34 च्या माध्यमातून बंद स्थितीत असलेली आरो मशीनची बातमी व्हायरल झाल्याने तात्काळ पालिकेने आरो दुरुस्त केला व नागरिकांना प्यायला पाणी मिळाले.
नागरिकांच्या मूलभूत गरजेची बातमी news34 ने समोर आणल्यावर पालिका प्रशासन खळबळून जागे झाले व ती मशीन दुरुस्त झाली.
गडचांदूर शहरातील नागरिकांनी याबद्दल news34 चे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here