गडचांदूर बसस्थानक वरील थंड पाण्याची(आरो)मशीन बनली शोभेची वस्तू, कोरोनाच्या धर्तीवर न.प.चे याकडे दुर्लक्ष, लोकांची मात्र तहानेने कासावीस

0
194
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील मुख्य मार्गावरील अदृष्य बसस्थानकच्या प्रसाधन गृह लगद लोकांना शुद्ध,निर्मळ व शितल जल मिळावे यासाठी गेल्या वर्षी थंड पाण्याची मशीन (आरो) बसवण्यात आले.यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्याप्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय झाली होती.मात्र अचानकपणे कोरोनाचे संकट उभे झाले. सरकारने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले.”घरी राहा सुरक्षित राहा” असे आवाहन करण्यात आले.याच दरम्यान एसटी बसेस आणि इतर वाहतूक पुर्णपणे बंद होती मात्र आता काही दिवसांपूर्वी वाहतूक सुरू झाल्याने शहरात व विशेषतः बसस्थानक परिसरात लोकांची रेलचेल वाढली.सुर्य नारायण आग ओकत असल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.हॉटेल बंद असल्याने तहानलेल्या लोकांची पिण्याच्या पाण्याची मोठ्याप्रमाणा गैरसोय होत आहे.अशातच बसस्थानक वरील थंड पाण्याची मशीन (आरो)निव्वळ शोभेची वस्तू बनली असून गेल्या एक महिन्यापासून बंद पडलेल्या या आरोला आता सुरू करण्याची गरज होती मात्र स्थानिक नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करित असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.बरेचदा कर्मचारी येऊन पाहणी करतात मात्र काहीच सकारात्मक घडत नसल्याचे आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात आले आहे.नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करत कोरोनाच्या नावाखाली निव्वळ लोकांना वेठीस धरले जात असल्याचे आरोप अनेकांकडून होत असून बंद अवस्थेत पडलेल्या सदर आरो मशीनला त्वरित सुरू करून रणरणत्या उन्हात लोकांना ठंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.आता नगरपरिषद प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here