गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कोरपना येथे अंदाजे 137 घरकुल मंजूर असून त्यातील कित्येक लाभार्थ्यांनी बांधकाम सुद्धा सुरू केल्याचे चित्र आहे.परंतु बांधकाम स्लॅब लेवल होऊनही तीन महिने लोटले खात्यात पैसे (अनुदान) जमा झाले नसल्याने पुढील बांधकाम करायचे तरी कसे अशा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.बांधकाम अर्धवट पडल्याने पुढील कामासाठी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी पाठपुरावा करून तात्काळ अनुदान निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ कोरपना कार्याध्यक्ष प्रशांत लोडे यांनी केली आहे.
प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत ज्यांना सिमेंट विटांचे पक्के घर नाही अशा व्यक्तींना घरकुल मंजूर झाले.परंतु अगोदर लाभार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने बांधकाम करायचे आहे.त्यानंतर सदर कामाचे बिल सादर करून तीन टप्प्यात अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात.मात्र अनुदान देण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने घरकुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे.लाभार्थ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील बिल सादर करून तिन महिन्यांच्या कालावधी लोटला मात्र अजुनही यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही.शहरी भागातील लाभार्थ्यांना घरकुलासाठी अडीच लाखांचे अनुदान असून यामध्ये केंद्र व राज्य सरकार या दोघांचा वाटा आहे.पहिल्या टप्प्यातील अनुदान देण्यात आले परंतु ज्या लाभार्थ्यांचे बांधकाम स्लॅब लेव्हल आले अशांना दुसऱ्या टप्यातील अनुदान तीन महिन्याचा कालावधी लोटूनही खात्यात जमा झाले नाही.सध्या सुरू असलेला मे महिना शेवटच्या टप्प्यात असून काही दिवसांत पावसाचे आगमन होणार आहे.अशातच घरकुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार हे मात्र नक्की.यासाठी नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी पाठपुरावा करून उर्वरीत निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रशांत लोडे यांनी News34 च्या माध्यमातून केली आहे.
कोरपना नगरपंचायत अंतर्गत घरकुल निधी लाभार्थ्यांना त्वरित द्या, नगराध्यक्ष व उपाध्यक्षांनी पाठपुरावा करावा, प्रशांत लोडे यांची मागणी
Advertisements