कोरेन्टाईन असलेल्या युवकांच्या मदतीला धावली युवासेना

0
207
Advertisements

चंद्रपूर – ऊर्जानगर ग्राम पंचायत मध्ये ग्राम पंचायतच्या शाळेत ठेवलेल्या नागरिकांना दोन वेळचं चांगल पोटभर जेवण मिळत नसल्याची तक्रार काल युवासेना जिल्हा समन्वयक यांना आली असता शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हा समन्वयक निलेश बेलखेडे यांनी शिवसेना तालुका प्रमुख संतोष नरुले यांच्यासोबत ऊर्जानगर ग्रामपंचायत सचिव यांची भेट घेऊन याबद्दल चर्चा केली व याच फल स्वरूप त्या नागरिकांना चांगलं पोटभर जेवण मिळाले. इतकंच नव्हे तर निलेशभाऊंनी त्याना आपल्या वतीने तांदूळ धान्य पोहोचविले. संतोष भाऊ नरुले आणि निलेश भाऊ बेलखेडे यांनी यापुढे कॉरोनटाईन असलेल्या नागरिकांना मध्ये असं कुणीही उपाशी पोटी राहणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश येथील युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. त्याबद्दलचे तेथील कॉरोनटाईन नागरिकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे, इंजि. निलेश भाऊ बेलखेडे, संतोषभाऊ नरुले यांचे आभार मानले.यावेळीं युवासेना सरचिटणीस सागर तुरक, अश्विन देवतळे, आदर्श लडस्कर यांची उपस्तीथी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here