चंद्रपुरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आता ऑनलाइन, जाणून घ्या या ऍप बद्दल

0
198
Advertisements

चंद्रपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घेताना इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी वेबफोरोस कंपनीने तयार केलेले डीलाईव्हआर ॲप जिल्हा प्रशासन लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाने वेबफोरोस कंपनीचे यासंदर्भात परस्पर सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी काही दिवसातच हा ॲप जीवनावश्यक पुरवठा करण्यासाठी सेवा देणार आहे. De-Live-R हा ॲप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकता. यासाठी सध्या या लिंक वर जाऊन ऐप डाउनलोड करू शकता http://weblist.webphoros.com/app/deliver.0.1.4.apk  या लींकचा वापर करुन ॲप डाऊनलोड करावा.

Advertisements

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होत असताना. हा प्रसार रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाय योजना  तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. लॉकडाऊच्या काळामध्ये  जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक घरा बाहेर पडत आहे. परंतु बाहेर कोरोनाचा संसर्ग कधी पण होऊ शकतो, हा संसर्ग होऊ नये व नागरिकांना वेळेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच व्हावा, त्यावर नियंत्रण असावे, कोणाची फसवणूक होऊ नये,तसेच नागरिकांचा यामध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी डीलाईव्हआर ॲपची मदत होणार आहे.

सुरुवातीला सहा महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात होणार आहे. ही सेवा सर्वांसाठी मोफत आहे. याचा गैरवापर किंवा कोणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यावर प्रायव्हसी पॉलिसीचा भंग केल्यास संदर्भात गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे.

या ॲपवर ग्राहक आणि संबंधित दुकानदार या दोघांनीही आपली नोंदणी करणे आवश्यक आहे किराणा किंवा तत्सम खरेदीसाठी ज्या पद्धतीने चिट्ठी बनवली जाते त्याच पद्धतीने सोप्या भाषेत हा ॲप सामान्य नागरिकाला देखील वापरता येणार आहे यासाठी स्थानिक भाषेतील अनेक शब्दांचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकाला त्याचा मालक घरी प्राप्त झाल्यानंतरच खरेदी केलेल्या वस्तूंचे पैसे द्यायचे आहे.

हा ॲप कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आल्यामुळे ग्राहक दुकानदार आणि घरपोच वस्तू पोहोचवून देणाऱ्या व्यवस्थेतील प्रत्येकाच्या संपर्काची सूची देखील प्रशासनाला उपलब्ध होणार आहे त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव झाल्यास लगेच उपाययोजना करणे प्रशासनाला सोपे होणार आहे.

किराणा, भाजीपाला, मेडिकल, डेअरी बेकरी, अंडी, चिकन, मटन, वॉटर कॅन आधी काही प्राथमिक विभागणी या ॲप मध्ये करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग होत असून काल या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार व वेबफोरस या कंपनीचे संचालक मोहित चुग, निखिल शेंडे, प्रीतम भीरूड यांच्यात सामंज्यस करार झाला. कंपनीचे संचालकांनी यावेळी सामाजिक दायित्व च्या भूमिकेतून हा ॲप आम्ही तयार केला असून या संबंधीत काही अडचण असल्यास 9730854135, 770949066, 9637404761 या क्रमांकावर संपर्क साधावा. चंद्रपूरच्या नागरिकांनी या ॲपचा वापर करावा व घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here