चंद्रपुरातील बाबूपेठ मध्ये कोरोनाचा शिरकाव, महिलेला कोरोनाची लागण, कोरोना रुग्णांची संख्या 13

0
122
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात आता कोरोना कहर करीत आहे, बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.

सध्या बाबूपेठ येथील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे, ही महिला मुंबई मधून आपल्या घरी आली होती, प्रशासनाला सहकार्य करीत स्वतः रुग्णालयात जात ही महिला होम कोरेन्टाईन होती, त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही अशी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
नवा रुग्ण चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील आहे. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) होती.१६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली.तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या युवतीच्या घरातील आई,वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
22 मे च्या रात्री आलेल्या या अहवालामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 13 झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी एकूण 10 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 13 पॉझिटिव्ह झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here