भुरकुंडा (बु.) गावात कापूस पेटवा आंदोलन

0
114
Advertisements

राजुरा प्रतिनिधी
कापसाच्या प्रश्नासाठी दि. 22 मे ला कापूस ऊत्पादक शेतक-यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या प्रतिकात्मक कापूस पेटवा आंदोलनाला राजुरा तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळाला. गावागावातील शेतक-यांनी पाच-पाच च्या गटात एकत्र येऊन कापूस पेटवून घोषणा देऊन आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते व माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी राजुरा येथील आपल्या घरासमोर पाच प्रमुख कार्यकर्त्यांसोबत मूठभर कापूस पेटवून सरकारच्या कापूस ऊत्पादक शेतक-यांवर सरकार कडून होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला.तसेच भुरकुंडा (बु.) गावात दिलीप देठे यांचा नेतृत्वात कापूस पेटवा आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
शेतक-याने वर्षभर अति कष्टाने पिकविलेल्या कापसाला सरकार व यंत्रणा आधारभूत भाव देऊ शकत नाही, ही शोकांतीका आहे. सरकारने तातडीने महाराष्ट्रभर सिसीआयची कापूस खरेदी केंद्रे तात्काळ वाढवावी व गाड्यांच्या संख्येचे बंधन ठेवण्यात येऊ नये, सध्या सरकार एफएक्यू कापुसच 5550 रु. दराने खरेदी करते, परंतु शेतकऱ्यांकडे 20% कापूस हा फरतड/ नॉन एफएक्यू आहे. त्याला ग्रेड नाही. म्हणून त्या कापसाकरिता आखूड धाग्याच्या कापसासारखे 4755 रु. भाव ठरवून तात्काळ खरेदी सुरू करण्यात यावी व शेवटच्या बोण्ड पर्यंत कापूस घेतला जावा,शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या कापसाचे 28 फेब्रुवारी 2020 पासूनचे थकलेले चुकारे- पेमेंट तातडीने करण्यात यावे. सिसीआयच्या केंद्रावर गाड्या मोजण्याचे काम सकाळी 7 ते सायं. 7 पर्यंत करण्यात यावे, ज्या कापूस उत्पादक पट्ट्यात सिसीआयची खरेदी केंद्रे उभी करण्यात आली नाही वा करणे शक्य नाही, अशा भागात शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना ज्या दराने कापूस विकला ती पट्टी व किमान वैधानिक किंमत यातील फरक/भावांतर शेतकऱ्यांना देण्यात यावे, सर्व शेतकऱ्यांवरील थकीत कर्जे व वीजबिल तातडीने संपवण्यात यावे, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आले. या आंदोलनात बबन रणदिवे, नारायण आडे, सतीश पुणेकर, शरद बोबडे, रामचंद्र वाडगुरे,परशुराम वाडगुरे, विठ्ठल आडे, तुकाराम घोटेकर, तुकाराम दुमने, मिथुन लेंगुरे, मनोज चांदेकर, वसंत पुंकर, यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here