ही कसली वागणूक? आमदार जोरगेवार भडकले

0
102
Advertisements

चंद्रपूर – कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालात उपचार घेत असलेल्या रुग्णांची योग्य देखभाल केल्या जात नसल्याचा तक्रारी प्राप्त झाला आहे. हे योग्य नाही. येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेऊन बरा झाल्यानंतर त्याला रुग्णालय आणि पर्यायाने रुग्णालयातील कर्मचा-यांचा अभिमान वाटेल अशी सहानुभूतीपूर्वक वागणूक रुग्णांना द्या, अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य विभागाला केल्या आहे.
कोरोना बाधीत रुग्णांची योग्य देखभाल होत नसल्याच्या व्हिडीओ समाज माध्यमावर वायरल झाल्यानंतर आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत डॉक्टरांची बैठक घेतली यावेळी कोरोना बाधीत रुग्णांच्या परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.
दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेला चंद्रपूर जिल्हा अचानक कोरोनाचे १३ रुग्ण मिळाल्याने सामान्य झोनमध्ये गेला आहे. यातील दोन रुग्णांवर नागपूर मध्ये उपचार सुरु आहे तर ११ रुग्णांचा उपचार चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु आहे. मात्र या रुग्णांची येथे चांगलीच गैरसोय होत असून या रुग्णांप्रती डॉक्टरांची वर्तवणूक योग्य नसल्याच्या तक्रारी येत आहे. यातील एका रुग्णाने आपली व्यथा व्हिडीओच्या माध्यमातून वायरल केली आहे. मदत मागीतली होती. याची तात्काळ दखल आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली असून आज त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत तेथील वस्तूस्थितीची पहाणी केली. कोरोनाचा उपचार करत असलेल्या कोरोना रुग्णांना आवश्यक त्या सर्व वस्तू उपलब्ध करुन देण्यात याव्हात अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात.

या रुग्णांचा दोन वेळचा सकस आहार देण्यात यावा. या रुग्णांना एकांतात ठेवण्यात आले आहे. त्यामूळे त्यांचे मानसीक तणाव वाढत आहे. ही बाब लक्षात घेता सर्व कोव्हीड उपचार वार्डात टिव्ही लावण्यात यावेत, रुग्णांच्या बेडसिड नियमीत बदलविण्यात याव्यात, सॅनिटायजर, मास्क, दैनंदिन वापरातील सर्व वस्तू, पाण्याची व्यवस्था, स्वच्छ बाथरूम तसेच प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र रुम देण्यात यावे अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कोव्हीड रुग्ण तक्रार निवारण कक्ष तयार करण्याच्यात यावे, रुग्णाच्या परिस्थितीची माहिती त्याच्या पालकांपर्यत पोहचविण्याची सोय करण्यात यावी. अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. यावेळी अधिष्ठाता डॉ. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. अनंत हजारे, डॉ. सोनारकर, आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here