वीज, गृह व पाणी कर माफ करावा – वर्षा कोठेकर यांची मागणी

0
96
Advertisements

चंद्रपूर – कोरोनाच्या संकटात सध्या देशवासी बेजार झाले आहे, मागील 3 महिन्यापासून नागरिकांच्या हाताला काम नाही, परंतु या परिस्थितीत सुद्धा वीज बिल व पाणी कर साठी कर्मचारी तगादा लावत आहे.
या करापासून शहरवासीयांना मुक्ती द्यावी व त्यांचे वीज व पाणी, गृह कर संपूर्ण माफ करावे या मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख वर्षा कोठेकर यांनी महापौर यांना दिले.
यावर महापौर राखी कांचर्लावार यांनी गृह कर माफ होणार सध्या पाणी कर माफ कसा करण्यात येणार याबद्दल विचार करू असे आश्वासन दिले.
खाजगी शाळांची 3 महिन्याची फी पूर्णतः माफ करावी यासाठी शिक्षणाधिकारी डोरलीकर यांना निवेदन देण्यात आले आहे, निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राणी येलेकर, विद्या चितडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here