यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जलसेवा रथ च्या माध्यमातून टंचाईग्रस्त भागात पाणी पूरवठा

0
100
Advertisements

चंद्रपूर – दरवर्षी प्रमाणे यंदा हि मनपाच्या नियोजनाअभावी इरई धरणात मूबलक पाणीसाठा असतांना सुध्दा शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच पायपीठ होत आहे. या पार्श्वभूमीवर पून्हा यंग चांदा ब्रिगेड नागरिकांच्या सेवेसाठी समोर आली असून आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जलसेवा रथ सुरु करण्यात आले आहे. या रथाच्या माध्यमातून टंचाईग्रस्त भागात पाणी पूरवठा केल्या जात आहे.
यंग चांदा ब्रिगेड संकटकाळी नेहमीच नागरिकांच्या सेवेकरिता अग्रस्थानी राहली आहे. कोवीड १९ च्या संकटात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सॅनिटायजर, माक्स, जनजागृती फलक, किराना – राशन किट, भाजीपाला गरजुपर्यंत पोहविण्यात आला. आता शहरातील पाणी टंचाई लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जलसेवा रथ सुरु करण्यात आला आहे. आज या जल सेवा रथचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे राजु जोशी, वंदना हातगावकर, प्रतिक शिवणकर, सुर्या अडबले, सलिम शेख आदिंची उपस्थिती होती.
सध्या शहरात भिषण पाणी टंचाईचे सावट उद्भवले आहे. शहरातील अनेक भागात नळाला पाणी येत नसल्याने नागरिक हैराण आहेत. तर अनेक भागात दोन ते तिन दिवसाआळ नळ सोडल्या जात असल्याने गरजे इतके पाणी नागरिकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे उन्हाळयात पाण्याची गरज अधिक असते असे असतांनाही पाणी पूरवठा नियमीत होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. चंद्रपूर जिल्हाचा पारा ५० अंशाच्या पल्लीकडे गेला असताना या तपत्या उन्हात नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच पायपीठ होत आहे. मात्र आता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात आलेला जल सेवा रथ थोड्या प्रमाणात का होई ना दिलासा देणारा आहे.
या रथच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक गल्ली पिजूंन काढण्यात येणार असून टंचाईग्रस्त भागात पाणी पोहचविण्यात येणार आहे. कोरोनामूळे सामुहिक अंतर पाळल्या जावे या करिता यंग चांदा ब्रिगेडने टॅंकर ऐवजी पाण्याच्या टॅंकचा वापर केला आहे. या रथावर संपर्क नंबरही टाकण्यात आला असून गरजुंनी या क्रमांकावर पाण्यासाठी संपर्क करावा असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षीसुध्दा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नागरिकांसाठी अशाच प्रकारे पाण्याची सोय केली होती.

यंग चांदा ब्रिगेडची पाणी विकत घेऊन नागरिकांना नि:शुल्क सेवा

चंद्रपुरात निर्माण झालेली मानवनिर्मित पाण्याची टंचाई पाहता शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या सामाजिक संस्थेचे पाण्याच्या टॅंकमध्ये मनपाने पिण्याचे पाणी भरून द्यावे अशी मागणी करण्यात आली होती मात्र या मागणीकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष करत पाणी विकत द्यावे कसे सांगितले त्यानुसार यंग चांदा ब्रिगेडने मनपाकडून पाणी विकत घेत ते टंचाई भागात नि:शुल्क वाटप सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here