गणेश लोंढे / नांदा फाटा
नारंडा फाटा येथील मुरली सिमेंट लगत पेट्रोल पंप जवळ काल दि.21 तारखेला गुरवारला सायंकाळी 7 च्या सुमारास ट्रक चालकाचा उभ्या ट्रकच्या कॅबिन मध्ये मृत अवस्थेत आढळून आला आहे.सदर व्यक्ती चे नाव महेंद्र नरसपूरे रा.पडोली फाटा चंद्रपूर येथिल रहिवासी असून नांदा फाटा येथील शांती कॉलोनी येथे वास्तव्यास राहत असून हा अमरदीप कोल सप्लायर ट्रान्सपोर्ट गडचांदुर या कंपनीमध्ये ट्रक चालक म्हणून काम करत होत गाडी क्रमांक MH 40 N 6763 या गाडीमध्ये महेंद्र हा मृत अवस्थेत आढळून आला.सदर घटनेची माहिती पोलिस स्टेशन कोरपणा येथे मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठवला आहे.मृतकाच्या परिवाराला अमरदीप कोल सप्लायर यांच्याकडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली असून मृतक महेंद्र यांच्या कुटुंबात मातारी आई सोबत पत्नी व लहान मुलगा असून कुटुंबातील कमविणारा अचानक गेल्याने कुटुंबावर मोठं संकट उभे असून हळहळ व्यक्त होत आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस स्टेशन कोरपणाचे ठाणेदार गुरनुले यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.