चंद्रपूर – कोरोनाचा वाढता उद्रेक बघता विरोधी पक्ष भाजपने या कठीण काळात सुद्धा राजकारण मध्ये आणलेल आहे, महाविकास आघाडी पासून महाराष्ट्र बचाव असे आंदोलन भाजपने सुरू केले.
चंद्रपूर शहरात मात्र हे चित्रच उलट आहे, शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील वृंदावन नगर परिसरात 6 महिन्यांपूर्वी सिमेंट रोडच उदघाटन झाले होते, तो मार्ग अवघ्या 6 महिन्यातच उखडून पडला, लाखो निधी खर्च करून या मार्गाचे निर्माण झाले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या मार्गाचे काम झाले परंतु पाणी जिरलं कुठं? त्यामुळे मार्गाला मोठ्या भेगा पडल्या, विशेष म्हणजे या प्रभागात 4 नगरसेवक भाजपचे आहे.
वृंदावन नगरवासीयांनी प्रभागातील लोकप्रतिनिधी यांचेवर आरोप लावला की या मार्गातील भेगा म्हणजे तुमचा भ्रष्टाचार आहे.
याबाबत नागरिकांनी न्याय मिळावा याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचेकडे धाव घेतली.
गिर्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे राहुल विरुटकर, कुसुम उदार, प्रणय धोबे यांनी त्या मार्गाची पाहणी केली व तात्काळ या कामाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू असे आश्वासन नागरिकांना दिले.
राज्यात महाराष्ट्र बचाव, चंद्रपूर शहरात वृंदावन नगर बचाव, अवघ्या 6 महिन्यात सिमेंट रस्त्याला पडल्या भेगा
Advertisements