आम्ही अडचणीत आहो, सुटका करा आमची, आदिवासी मजुरांची आर्त हाक

0
53
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील 11आदिवासी तरूण रोजगारासाठी गुजरात लगतच्या दमन येथे गेले होते. दाभेल ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्युत उपक्रमाच्या कंपनीत कंत्राटदारामार्फत काम करीत असताना लॉकडाऊन जाहीर झाला आणि उद्योग बंद पडले.

मार्च महिन्याचा पगार घेऊन ते गावातच भाड्याच्या घरात रहायला गेले. मागील 50 दिवसांपासुन खोलीत बसून पोटाची आग विझवीत आहे. घरमालका शिवाय कोणीच ओळखीचा व मदतीला कुणीच येत नसल्याचे पाहून चिंतेत वाढ झाली आहे. विपूल तोडासे,प्रज्योत कोरवते,प्रकाश कोचाळे,सूरज कोरांगे, विपुल पंधरे,लक्ष्‍मण मडावी,भास्कर आत्राम,वृषभ मरस्‍कोले,शुभम शेळके,प्रथम कुळमेथे, रोहित कोरवते हे आदिवासी तरूण त्याठिकाणी अडल्याने कुटुंबांमध्ये मुलांच्या येण्याची परिवाराला चिंता लागली.

दमन येथून युवकांनी कोरपन्यातील जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांच्या सोबत संपर्क करून त्याठिकाणी निर्माण झालेल्या अडचणी,उपासमारी,गैर व्यवस्थेबद्दलची हकिकत मांडली. “कानूभाई बिल्डिंग आझीया वार्ड दाभेल येथील घराच्या बाहेर जाता येत नाही,पोलिस आम्हाला बाहेर भटकू देत नाही,आम्ही अडचणीत आहोत,गावाची ओढ लागली,आमची येथून सुटका करा” अशी विनवणी करत होते.ही बाब अली यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अवगत करून दिली व पाठपुरावा करून यांच्या विषयी विनंती केली.मात्र दमन येथे मजुरांची नोंदणी करण्यासाठी अडथळे येत असल्याने ते युवक बेजार झाले.त्यांच्याकडे खर्चाला पैसे नसल्याने व कंपनीकडून खाली वेळेचा पगार देण्यास नकार मिळाल्याने चिंतेत वाढ झाली.ही बाब खासदार बाळू धानोरकर यांना कळविली लगेच त्यांनी त्यांचे खाजगी सचिवांना सूचना देऊन दाभेल येथे कार्यकर्त्यांसोबत संपर्क करून त्या आदिवासी मुलांना मदत करण्याचे कळवले.कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दमन येथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचना देऊन पाठपुरावा केल्याने स्थानिक दाभेल ग्रामपंचायत कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले दोन महिन्यापासून अडकलेल्या या युवकांच्या आरोग्याची तपासणी व टोकन नोंदणी झाली असून आबीद अली यांच्या प्रयत्नाने गेल्या दोन महिन्यांपासून एकाच खोलीत दिवस काढत असलेल्या या आदिवासी युवकांचा घरी येण्याचा मार्ग सुकर झाला हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here