सुगंधित तंबाखूचा व्यापार करणाऱ्यांवर मोहितेंची धडकी, आजच्या कारवाईत 1.50 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

0
108
Advertisements

चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूचा व्यापार चंद्रपूर जिल्ह्यात छुप्या मार्गाने सुरू आहे, सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी छुप्या मार्गाने होत असलेल्या व्यापाऱ्यांवर अंकुश लावण्याचे काम करीत आहे.
आतापर्यंत तब्बल 24 लाखांचा सुगंधित तंबाखू मोहिते यांनी कारवाईत पकडला आहे, ही धाडसत्र मोहीम जोमाने सुरूच आहे.
21 मे ला विवेकानंद वार्डातील हरीश ठक्कर यांच्या दुकानाची चौकशी केली असता त्यामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखूचा साठा मोहिते यांनी जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या साठ्याची बाजार भावनुसार किंमत 1.50 लाख इतकी आहे.

सदर साठा हा जप्त करून नमुने विश्लेषण साठी पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मोहिते यांच्या धाडसत्राने अवैध व छुप्या मार्गाने व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here