गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील सरपंचाने शेजारील महिला व तिच्या मुलामुलीला बेदम मारहाण केल्याची घटना 17 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.महिलेच्या तक्रारीनंतर तब्बल 3 दिवसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे गडचांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला असून उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशानंतर मारहाणीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सरपंच गणेश नामदेव पेंदोर (33), नरेश नामदेव पेंदोर (31) व नामदेव पेंदोर (67) अशी आरोपींची नावे आहे.सविस्तर वृत्त असे की,मिरा संतोष पाटील हिच्या घरचे कपडे धुण्याचे पाणी सरपंच पेंदोर यांच्या घरात उडाल्याच्या कारणावरून भांडण होऊन त्याचे रूपांतर मारामारीत झाले.सरपंच गणेश पेंदोर व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून मीरा संतोष पाटील यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना जबर मारहाण झाली.सदर महिला नांदाफाटा पोलिस चौकी येथे तक्रार दाखल करायला गेल्यानंतर येथील एका पोलिसांनी तिची समजूत काढून प्रकारण मिटवून टाका म्हणून तिला घरी पाठविले. आपल्या घरच्या लोकांना इतके मारल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याने सदर महिलेने उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या प्रकरण लक्षात आणून दिले.उपवि पोलिस अधिकारी यामावार यांच्या निर्देशानुसार गडचांदूर पोलिसांनी मारहाणीबाबत गुन्हा दाखल केला.तसेच सरपंच गणेश पेंदोर यांचे पत्नीची तब्येत बरी राहत नसल्याने त्या महिलेने जादूटोणा केला असा संशय पेंदोेरला असल्याने नेहमी भांडण करीत असतात व त्यामुळेच मारहाण केल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. मात्र जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण केल्याचे तोंडी तक्रारीत सांगितल्यानंतरही उल्लेख न केल्याने महिलेला पोलिसांकडुन न्याय मिळाला नसल्याचे मत व्यक्त होत आहे.पोलीसांनी तिन्ही आरोपींवर भादंविच्या कलम 324,34 नुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून 17 मे रोजी तक्रारीनंतर 323,294 व 506 नुसार अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली होती.
———-//——-
“सरपंच गणेश पेंदोर यांच्या पत्नीची प्रकृती ठीक राहत नसल्यामुळे मी जादूटोणा केल्याचा संशय त्यांना आहे. त्यामुळे नेहमी किरकोळ भांडणे आमच्यामध्ये होत असतात.त्याच संधीचा फायदा घेत 17 रोजी गणेश पेंदोर, त्यांचा भाऊ व त्यांच्या वडिलांनी आमच्या कुटुंबाला व मला बेदम मारहाण केली. भविष्यात माझ्या जीवाला धोका आहे.”
(मिरा संतोष पाटील,तक्रारकर्ती)
———-//———
“मिरा पाटील यांचे धुण्याचे पाणी आमच्या खिडकीमधून वरणात पडले.धुण्याच्या पाण्यावरून आमच्या दोन्ही घरच्या महिलांचा वाद झाला. मी तिला मारहाण केली नसून माझ्यावर केलेले संपूर्ण आरोप खोटे आहे.मला फसवण्यात येत आहे.”
(गणेश पेंदोर सरपंच,नांदा)
नांदा सरपंचाकडून महिला व मुला-मुलीला अमानुष मारहाण, जादूटोणा केल्याचा संशय, 3 दिवसानंतर गुन्हा दाखल
Advertisements