बुरड कामगारांना हिरव्या बांबूचा पुरवठा करा, पटकोटवार यांची मागणी, शासन निर्णयाला वनविभागाचा खो

0
57
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
बुरड कामगारांना उत्तमपणे जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे कार्डधारकांना दरवर्षी 1500 नग हिरव्या बांबूचा पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.बुरड कामगाराकडून वारंवार मागणी केली जात आहे मात्र बांबूच्या पुरवठा होत नसल्याने उपासमारीची पाळी आली असून कामगारांच्या या परिस्थीतीला वनविभाग जबाबदार असल्याचे आरोप होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना,कोठारी,तोहगाव,गडचांदूर,पोंभुर्णा याठिकाणी मोठ्याप्रमाणात बूरड कामगार वास्तव्यास आहे.हिरव्या बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तु तयार करणे त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून बांबूपासून विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू तयार व विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मात्र सवलतीच्या दरात मिळणारा हक्काचा बांबू त्यांच्यापासून हिरावल्या जात असल्याचे चित्र असून गेल्या काही वर्षांपूर्वी उत्तम दर्जाचा बांबू पुरवठा होत होता मात्र वनविभागाचे काही अधिकारी बूरड कामगारांसाठी असलेला बांबू ठेकेदारांना विकत असल्याचे सुद्धा आरोप होत असून बांबू शिवाय बुरड कामगारांचे जीवन जगणे कठीण आहे.त्यांना कामासाठी दररोज बांबू लागतो.परंतु वनविभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे कामगारांना बांबूपासुन वंचित राहावे लागत आहे.बांबू पुरवठा होत नसल्याने कसे जगावे अशी समस्या निर्माण झाली आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोरपना,कोठारी,तोहगाव,गडचांदूर येथे बांबूचा पुरवठा करावा अशी मागणी गडचांदूर ग्रामपंचायतचे माजी सदस्य संतोष पटकोटवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर,उप वनसंरक्षक मध्यचांदा,वनविभाग चंद्रपूर व वनपरिक्षेत्र अधिकारी वनसडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here