कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांना शिक्षण शुल्कात सूट द्या- आ. किशोर जोरगेवार

0
31
Advertisements

चंद्रपूर – कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे देशासह चंद्रपूरातही आर्थिक संकट कोसळले आहे, अशात शाळा महाविद्यालयांचे नवे शालेय सत्र सुरु होत असल्याने शिक्षण शुल्क भरण्यासाठी खाजगी संस्था चालक पाल्यांना त्रास देत आहे, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण शुल्क भरण्याची सक्ती न करता शिक्षण शुल्कात सूट देण्यात यावी अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून याबाबतचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्ह्याधिकारी कुणाल खेमणार यांना देण्यात आले आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजविला आहे. यामुळे अर्थव्यवस्था चांगलीच प्रभावित झाली आहे. कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वत्र बंदिचे चित्र दिसून येत आहे. याचा फटका शाळा, महाविद्यालयालाही बसल्याचे दिसून येत आहे. आता शैक्षणिक सत्र सुरु होत असल्याने सध्या अनेक खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र यातच अनेक खाजगी शाळा, कॉन्व्हेंट, महाविद्यालयीन व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या पाल्यांना नव्या सत्राचे शुल्क भरण्याची सक्ती केल्या जात आहे. त्यामूळे पाल्य अडचणीत सापडला आहे. चंद्रपूरात रोजनदार वर्ग अधिक आहे. त्यामूळे संचारबंदीच्या काळात त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर आधिच आर्थिक संकट कोसळले आहे. आता त्यात मुलांचे शिक्षण शुल्क भरायचा कसा अशा प्रश्न त्यांच्यापूढे उभा आहे. शासनानेही खाजगी शैक्षणीक संस्थांनी विद्यार्थ्यांना शूल्क भरण्यास सक्ती करु नये असे आदेश दिले होते. मात्र चंद्रपूरात या आदेशाची पायमल्ली होतांना दिसून येत आहे. त्यामूळे खाजगी शैक्षणीक संस्था चालकांची बैठक बोलावून पाल्यांना शुल्कासाठी सक्ती न करण्याचे निर्देश देण्यात यावे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण शुल्कात शूट देण्यात यावी.

अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. या आशयाचे निवेदनही त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना देण्यात आले आहे. तसेच शासनाच्या निर्देशाचे पालन न करणा-या संस्था चालकांविरोधात कारवाई करण्यात येणार असेही यावेळी जोरगेवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here