जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन, चिमूर शहरातील 2 व्यापाऱ्यांचे प्रतिष्ठान सील

0
144
Advertisements

चिमुर:- (सुरज कुळमेथे) सध्या सम्पूर्ण जगात कोविड 19 या संकर्मग्रस्त विशानुचा थैमान चालू असताना नगर परिषद प्रशासन लोकडॉउन बाबत जागरूकता पाड़त असताना शहरातील काही व्यापारी नियमाचे उल्लंघन करीत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या आदेशाचा भंग केल्या मुळे चिमुर नगर परिषद ने दोन व्यापर्याच्या दुकानाला सील ठोकत दंडात्मक कार्यवाही केली आहे,
सध्या भारत देशासहित महाराष्ट्र राज्यात सुधा कोरोना या संसर्ग जन्य विष्णुन्ने थैमान घातले असून चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यानी सुधा लोकडॉउन संदर्भात कठोर पाउले उचलली असून जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार कोरोनो विशानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चिमुर नगरपरिषद ने सुधा मुख्याधिकारी मंगेश खवले यांचे नेतृत्वात कम्बर कसली असून चिमुर शहरात विविध दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे, जिल्हाधिकारी चंद्रपुर यानी लाकडाउन काळात अटी व शार्थी नुसार दुकाने सुरु करण्याचे परवानगी दिली आहे,
दिनांक 18 में रोजी नगर परिषद चिमुर च्या फिरत्या पथकाला शरद गुप्ता व पवन गुप्ता यांच्या हार्डवेरच्या दुकानात गर्दी असल्याचे आढळून आले, तसेच हैंड वाश करिता व्यवस्था सुधा दिसून आली नाही, तसेच या आधी सुधा चिमुर नगर परिषद च्या फिरत्या पथकाला ही दुकाने सुरु असल्याचे आढळुन आले, दुकानमधे 6 पेक्षा जास्त व्यक्ति आढलुन आले, त्याना वारंवार सूचना देऊनही सूचनाचे पालन न करता जिल्हाधीकारी चंद्रपुर यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे 5 हजार रुपये दंडात्मक कार्यवाही व दोन दिवसाकरिता दुकान बंद करण्याचे आदेश देऊन आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र सुधा नगर परिषद ने जारी केले, तसेच अन्य दुकानावर सुधा कार्यवाही करत दंडात्मक कार्यवाही चिमुर नगरपरिषद तर्फ़्रे करण्यात आली,
सदर कार्यवाही मुख्याधिकारी मंगेश खवले यांच्या नेतृत्वात नगर अभियंता राहुल रणदिवे, हेमंत राहुलवार, मिनाज शेख घनश्याम उइके, शरद पाटील, प्रवीण कारेकर व नगरपरिषदची सम्पूर्ण टीम यानी ही कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here