आ. जोरगेवार यांनी केली चंद्रपूरातील अत्याधूनिक लॅबची पाहणी. वायरस बर्निंग युनिट तयार करण्याच्या सुचना

0
105
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यातील पहिल्या रुग्णाचा अहवाल १४ दिवसानंतर निगेटिव्ह आला आहे. या दोन्ही रुग्णांच्या अहवालाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामूळे आता खात्री जनक अहवाल प्राप्त होईल अशा लॅबची गरज आहे. दरम्यान चंद्रपूरात कोरोना तपासणी लॅब साकार करण्यात आली आहे ही अभिमानाची बाब आहे. या अत्याधूनिक लॅब मधून अधिकाधिक नमुण्यांची तपासणी होईल अशी अशा व्यक्त करत ही लॅब खात्री पूरवक अहवाल देणारी लॅब ठरावी अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात.

काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कोरोना रुग्णांचा नमूना तपासण्याकरीता चंद्रपूरात तयार करण्यात आलेल्या अत्याधूनिक कोरोना लॅबचीही पाहणी केली. यावेळी वायरस बर्निंग युनिट तयार करण्यात यावे अशा सूचनाही आ. जोरगेवार यांनी केल्यात. या युनिटला लागणारा खर्च आमदार निधीतून देण्याची ग्वाही या प्रसंगी आ. जोरगेवार यांनी दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. निवृत्ती राठोड, लॅबचे प्रमूख डॉ. सुरपाम यांची उपस्थिती होती.

या लॅबच्या निर्मीतीमुळे कोरोना संशयितांचा नमुना तपासणीकरीता नागपूरला पाठविण्याची गरज नाही. आता याच लॅब मधूनच या नमुण्याची तपासणी होणार असून १२ तासाच्या आत त्याचा अहवालही प्राप्त होणार आहे. या अत्याधूनिक लॅबची पाहणी करत असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे कार्यरत डॉक्टरांचे कौतुकही केले. या लॅबच्या माध्यमातून अधिकाधिक नमुण्यांची तपासणी हाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ही तपासणी करत असतांना डॉक्टरांनीही सतर्क राहत काळजी घेण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. या लॅबमुळे अहवाल प्राप्त होण्यासाठी लागणार कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह किव्हा निगेटिव्ह रुग्णांची ओळख लवकर पाठविल्या जाणार असून त्या दिशेने योग्य उपाययोजना करण्यात प्रशासनाला मदत होणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

चंद्रपूरात सध्या तरी कोरोनाचा प्रादुर्भावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे. तरी सतर्कता म्हणून तयार करण्यात आलेली हि लॅब चंद्रपूरकरांसाठी वरदान ठरणार आहे. या लॅबमध्ये कोरोना वायरस सह इतर वायरसच्या तपासण्याही करण्यात येणार आहे. त्यामूळे या लॅबचे महत्व वाढले आहे. असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले. तसेच या ठिकाणी कोरोना वायरस सह इतर वायरस नष्ट करण्यासाठी बर्निंग युनिट तयार करण्याच्या सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात या बर्निंग युनिटच्या निर्मीतीसाठी लागणारा खर्च आमदार निधीतून देण्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले कोरोना विरोधातील लढ्यात डॉक्टर कोविड योध्दा म्हणून समोर आले आहे. मात्र डॉक्टरांची सुरक्षाही महत्वाची असून या लॅबमध्ये काम करत असतांना डॉक्टरांनीही खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. तसेच या अत्याधूनिक लॅबच्या निर्मीतीबदल आ. जोरगेवार यांनी डॉक्टरांचे कौतूक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here