Advertisements
चंद्रपूर – प्रतिबंधित सुगंधित तंबाकू पदार्थावर आता अन्न व औषध प्रशासन विभाग सावध झाले असून लॉकडाउन काळात या प्रतिबंधित वस्तूच्या विक्रीवर नियंत्रण मिळवीत आहे.
मागील काही महिन्यात नितीन मोहिते सहायक आयुक्त अन्न व औषध विभाग यांच्या नेतृत्वात प्रशंसनीय कार्य करीत आहे.
22 लाखांच्या कारवाईनंतर कारवाई चा धडाका सुरू असून आज या धाडसत्रात रहमतनगर येथील बिनबा गेट टीचर कॉलोनी परिसरात राहणारे ओबेदुल्लाह रसूल शेख यांच्या घराची झाडाझडती घेतली असता पाणी टॅंक मध्ये सुगंधित तंबाखू, रजनीगंधा पान मसाला यांचा साठा आढळून आला.
त्या सुगंधित पदार्थाची किरकोळ किंमत 54 हजार रुपये इतकी आहे तर बाजार भाव नुसार आजची किंमत 1 लाखांच्या घरात आहे.पुढील तपास सुरू आहे, नितीन मोहिते यांच्या कारवाईने सुगंधित तंबाखूचा अवैध व्यबसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.