Advertisements
गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” मुळे सरकारने सगळीकडेच लॉकडाउन जाहीर करून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले.याला प्रतिसाद देत नागरिकांनी सुद्धा घरटे सोडले नाही.परिणामी गोरगरीब रोजमजूरी करणारे,फुटपाथवरील लहानसहान दुकानदारांचे अक्षरशः जीवन जगणे कठीण झाले आहे.असे असताना आता बीपीएल धारकांना गृह व पाणी कर भरण्याचे संकट उभे झाले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या समस्त बीपीएल धारक गोरगरीब कुटुंबांचे गृह व पाणी कर माफ करावा अशी विनंती वजा मागणी निवेदनाद्वारे विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडे केली आहे.आता सत्ताधारी यावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.