चंद्रपूर – कोरोना विषाणूच्या महामारीने आज देशातील नागरिकांचे रोजगार संपुष्टात आणले, रोजगारावर कुऱ्हाड पडल्याने नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर, कामगार वर्गाना सामाजिक व राजकीय संघटनांनी जेवण, धान्य वाटप केल्याने काहीसा दिलासा मिळाला, लग्नकार्य, वाढदिवस अश्या अनेक कार्यक्रमातून तृतीयपंथी आपला उदरनिर्वाह करीत होते, परंतु देश संपूर्ण लॉकडाउन झाल्याने तृतीयपंथी यांच्यासमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला.
ही सारी व्यथा तृतीयपंथी यांनी प्राध्यापक जयश्री कापसे यांच्या समोर मांडली, प्राध्यापक कापसे यांनी याची माहिती युवा युथ फाऊंडेशन या सामाजिक संघटनेला दिली.
शामनगर परिसर, भगतसिंग चौक येथिल तृतीयपंथी यांची युथ फाऊंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांची समस्या जाणून घेतली व त्यांना 1 महिन्याचे धान्य, किराणा सामान देण्यात आले.
यावेळी सुबोध कासुलकर,साजिद कुरेशी,अश्विनी खोब्रागडे,आशिष मुंधडा,ऍड शकिर मलक,प्रफुल मेश्राम,गिरीश नंदूरकर, विलास,माथनकर महेंद्र राजूरकर ,व इतर सदस्य उपस्थित होते.