गावकरी व वनविभागात चिमूर पोलिसांची मध्यस्ती, पीडित परिवाराला मिळाली 5 लाख 50 हजारांची आर्थिक मदत

0
121
Advertisements

चिमूर – तालुक्यातील ताडोबा येथील कोर व बफर झोन जवळील सातारा शेत शिवारातील जंगलामध्ये 1 महिला तेंदूपत्ता तोडण्याकरिता गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्या महिलेला ठार केले.
ठार झालेली ती महिला कोलारा गावातील होती त्या महिलेचं नाव लिलाबाई जीवतोडे वय 63 वर्षे आहे.
घटनेनंतर वनविभाग यांच्या चमूला गावातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, जोपर्यन्त त्या मृत महिलेच्या परिवाराला आर्थिक मदत वनविभाग देणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलण्यास गावकऱ्यांनी विरोध दर्शविला.
यावेळी उपस्थित असलेले चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी वनविभाग व गावकऱ्यांमध्ये मध्यस्ती केली व त्या मृत महिलेच्या परिवाराला 5 लाख 50 हजारांची आर्थिक मदत द्यायला लावली.
कोलारा गावातील नागरिकांनी ठाणेदार स्वप्नील धुळे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here