अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई, 2 लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू सह माल जप्त

0
127
Advertisements

चंद्रपूर – एकीकडे कोरोना विषाणूने देशातील नागरिकांचे रोजगार हिरावून घेतले आहे, अनेकांचे रोजगार सुद्धा या लॉकडोउनमध्ये गेले, परंतु अवैध धंदे करणारे सध्या छुप्या मार्गाने काम करीत आहे.
लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा येत आहे, यावर अंकुश लावण्यासाठी चंद्रपूर जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे.
लॉकडाउन मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने आतापर्यंत 20 लाखांचा सुगंधित तंबाखू पकडला आहे.
शहरातील आनंद किराणा स्टोर्सच्या गोदामात, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या नेतृत्वात धाड मारण्यात आली.
या धाडीत 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की आपल्या परिसरात कुठेही सुगंधित तंबाकूचा व्यापार करीत असेल तर नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here