वाघाच्या हल्ल्यात कोलारा येथील महिला ठार

0
29
Advertisements

चिमूर:- सुरज कुळमेथे

चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लागत असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये महिला तेंदूपत्ता तोडण्या करीता गेली असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने सकाळी ६.३० अचानक पण केलेल्या हल्ल्यात लिलाबाई चंद्रभान जीवतोडे वय ६३ वर्षे रा कोलारा ही महिला जागीच ठार झाली आहे,या पूर्वी याच परिसरातील ही चौथी घटना आहे,गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावरत असतात सदर महिला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण मोल मजुरी करूनच करायचे या पूर्वी कोलारा येथील शेतकरी व महिलेला,व सातारा येथील महिलेला वाघाणे ठार मारले होते त्या मुळे परिसरातील जनता वाघाच्या दहशत मध्ये वावरताना दिसत आहे,शवविच्छेदन करण्याकरिता मृत्यदेह चिमूर उपजिल्हा रुगणल्यात नेण्यात आला आहे,शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी ,कोडापे वनपाल,नवघरे वनरक्षक वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here