गणेश लोंढे / नांदा फाटा
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून भारतात दिवसेंदिवस कोरोना पॉजीटीव्ह रुग्णाचा आकडा वाढत असल्याने आजपासून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्याला सुरवात झाली आहे. रेड,ऑरेंज,ग्रीन झोन अशा तीन झोन मध्ये जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे.ऑरेंज आणि ग्रीन झोन या जिल्ह्यांना काही विशिष्ट अटींवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शिथिलता देण्यात आली.त्या अनुषंगाने काही प्रतिष्ठाने वेळा पत्रकाप्रमाणे सुरु करण्याचे आदेश देण्यात आला आहे.कुठल्याही जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले नसून जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा वेळोवेळी होत असल्याची माहिती शासनाकडून देण्यात येत असली तरी ग्राहकांना लॉकडाऊनात वस्तूंची कमतरता असल्यामुळे चढ्या दराने विविध सामानांची खरेदी करावी लागत असल्याचे चित्र असून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची बाब म्हणजे याच आठवड्यात मिठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरविल्याने अनेक ग्राहकांनी मीठा चा साठा खरेदी करून ठेवला आहे तक्रार करण्यास शासनाने टोल फ्री नंबर दिला असला तरी गोरबरीब सामान्य व्यक्ती तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने यांच्यावर कुणाचे नियंत्रन नाही का हा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.संबधित विभागाचे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय असून लखलखत्या उन्हात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत असून संबधीत विभागाचे अधिकारी,कर्मचारी AC व कुलरच्या गारव्यात बसून खुर्च्या मोडत असल्याचे आरोप नागरिकांतून होत आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची बेभाव विक्री, संबधित विभाग कुलर व AC च्या गारव्यात मग्न
Advertisements