गडचांदूर प्रभाग 1 मधील नागरिक अस्वच्छता आणि मोकाट डुकरांमुळे हैराण, न.प.चे अक्षम्य दुर्लक्ष

0
36
Advertisements

गडचांदूर प्रतिनिधी/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ व औद्योगिकदृष्ट्या नावारूपास आलेले शहर गडचांदूर.याची लोकसंख्या अंदाजे 40 हजाराच्या जवळपास असून ग्रामपंचायत विसर्जित करून 6 वर्षापूर्वी याठिकाणी नगरपरिषद उदयास आली.तेव्हापासून तर आजतागायत शहराचा पाहिजे तसा विकास झालेला नाही.”नगरपरिषद मस्त,जनता त्रस्त” असे चित्र असून सध्याच्या परिस्थिती बद्दल बोलायचे झाल्यास समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांना उलट नानाप्रकारच्या गोष्टी नगरपरिषद प्रशासनाकडून ऐकायला मिळते.निव्वळ हुकुमशाही व अरेरावी सुरू असल्याने जनता न.प.येथे जाण्यासाठी घाबरतात ही वास्तविकता आहे.”नागरिकांना दिलासा” हे वाक्य केवळ हास्यास्पद असून परिस्थिती काहीशी वेगळीच आहे.याचे जीवंत उदाहरण म्हणजे येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता आणि मोकाट डुकरांचा हैदोस डोकेदुखी बनली आहे.येथील नागरिकांनी या समस्या विषयी कित्येकदा नगरपरिषदेत लेखी तक्रारी दिल्या.परंतु समस्येचे समाधान काही झालेले नाही.प्रभागात ठिकाणी सांडपाणी जमा झाल्याने मोकाट डुकरांनी बस्तान मांडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.एकीकडे कोरोना संसर्गजन्य रोग पसरू नये म्हणून नगरपरिषद इतर ठिकाणी निर्जंतुकीकरण करीत आहे तर दुसरीकडे प्रभाग एक मध्ये मोकाट जनावरे डुकरे गलिच्छ पाण्यात सैरावैरा फिरून नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहे.याबाबतीत co यांना विचारणा केली असता टोलवाटोलवीचे डोस पाजले जात असल्याचे आरोप होत असून समस्येचे निराकरण होताना दिसत नाही.या प्रभागातील साई मंदिर परिसर,बस स्टॉपचा मागचा भाग,रेल्वे पुलाच्या बाजूचा भाग,साई ले-आउट मधील ओपन स्पेस,पिंगे,खोब्रागडे,प्रा.जहीर यांच्या मागे जोगी यांचा खाली प्लॉट,या भागात सांडपाणी जमा होऊन त्यात डुकरे बसून राहतात आणि घाणीने माखलेले डुक्कर रस्त्याने फिरतात.याकडे स्थानिक नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून अखेर कितीदा द्यायची निवेदने,असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.बसल्या ठिकाणी नगरपरिदेचे गोडवे गाणाऱ्यांनी स्वत: एकदा तरी या प्रभागात फेरफटका मारून सत्य परिस्थिती पहावी अशी मागणी येथील त्रस्त नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here