अवैधरित्या सुरु असलेली दारु विक्री बंद करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी, बाहेर जिल्ह्यातून चंद्रपूरात दारु दाखल होत असल्याचा आरोप, पोलिस अधिक्षकांना निवेदन

0
60
Advertisements

चंद्रपूर – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी शिथिल करत दारु दुकाने ठरावीक वेळेसाठी सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे बाहेर जिल्हातून छुप्या मार्गाने दारु बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्हात दारु पोहचवीली जात असून ती अवैधरित्या महागात विकल्या जात आहे. विशेष म्हणजे ही दारु विषारी असल्याचेही काही उदाहरने समोर आली आहे. हि अति चिंतेची बाब असून चंद्रपूरात सुरु असलेली अवैध दारु विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबातचे निवेदनही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना देण्यात आले आहे.

वर्धा, गडचिरोली नंतर चंद्रपूर जिल्हातही दारुबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र या दोन जिल्हा प्रमाणेच चंद्रपूर जिल्हातही अवैध दारुची विक्री सुरु झाली असून हळूहळू दारु विक्रत्यांचे जाळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हात परसले आहे. दरम्याण कोरोणा विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले. परिणामी राज्यभरातील दारु दुकाने बंद होती. याचा परिणात दारु बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातही दिसून आला. लॉकडाऊनमुळे मागील दोन महिण्यांपासून चंद्रपूरातील अवैध दारु विक्री बंद पडली होती. मात्र आता शासनाच्या वतीने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आचारसहीता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे ठरावीक वेळसाठी येथील मद्य विक्रीचे दुकाने सुरु करण्यात आली आहे. यात चंद्रपूर लगतच्या यवतमाळ व नागपूर जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामूळे आता लगतच्या जिल्ह्यांसह बाहेर राज्यातून दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारु पोहचवली जात आहे. याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे चंद्रपूरात दारुविक्रीला पून्हा ओघ आला आहे. यातही मोठया प्रमाणात विषारी दारू दुप्पट तिप्पट किमतीमध्ये विकली जात आहे. सध्या लॉकडाउनमूळे काम बंद असल्याने पैसे नसणा-या तळीरामांनी दारु पीण्यासाठी घरच्या महिलांना काटकसर करुन जमा केलेल्या पैशासाठी त्रास देणे सूरु केले आहे. त्यामूळे घरगुती वादांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. तसेच विषारी दारुच्या सेवनाने शरीरीक हाणी होण्याची शक्यताही बढावली आहे. हि बाब लक्षात घेता बाहेर जिल्ह्यासह बाहरे राज्यातून चंद्रपूरात येत असलेल्या दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवून सुरु असलेली अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शाखेच्या वतीने करण्यात आली असून अशा आशयाचे निवेदनही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या संघटिका वंदना हातगांवकर, सायली येरणे, बाल रोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, चंदा वैरागडे, संतोषी चव्हाण, रूपा परसराम आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here