कोरोनाचे विषाणू नाकातच मारनार – औषधनिर्माण तज्ञ प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांचे नवीन संशोधन, पेटेंट दाखल, पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संपर्क

0
237
Advertisements

चिमुर:- सुरज कुळमेथे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभर हाहाकार माजला असतांना जगाचे सर्व लक्ष हे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध बनविण्यावर लागले आहे. अश्यातच कोरोनावर प्रभावी लस व औषध शोधण्याचे काम हे जगातील सर्वच मोठ्या औषधनिर्माण कंपन्यांनी तसेच रिसर्च संस्थांनी हाती घेतले आहे.
जगभरातील औषधनिर्माण तज्ञ दिवसरात्र संशोधनासाठी मेहनत घेत असतांना चिमूर तालुक्यातील नेरी येथील पण सध्या नागपूर येथे स्थायिक असलेले औषधनिर्माण तज्ञ प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या पुढाकारात डॉ. जिग्नेश दोशी, डॉ. सचिन टेम्भूर्ने, प्रा. मधुकर शेंडे, विवेक येन्नरवार, डॉ. शिल्पा पिसे या पाच शास्त्रज्ञांची चमू मागील तीन महिन्यांपासून कोरोनावर मात करणारी औषध बनविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नरत होती.
यादरम्यान अनेक प्रयोग करण्यात आलेत आणि कोरोनाचे विषाणू नाकात प्रवेश करताच त्यांना नाकात मारणारी औषध तयार करण्यात आली. या औषधीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविला जाऊ शकतो या संशोधनावर भारत सरकार कडे पेटेंट दाखील केले असून लवकरच सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रा. डॉ. अजय पिसे हे पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहेत.
प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे हे नागपूर येथील सुप्रसिद्ध बालपांडे फार्मसी (औषधनिर्माण) कॉलेज मध्ये प्रोफेसर असून त्यांची स्वतःची औषधनिर्माणशास्त्रावर संशोधन करणारी ‘रेडीअन्स रिसर्च अकॅडेमी’ आहे, यामध्ये अनेक रोगांवर संशोधन करण्यात येते. ‘रेडीअन्स रिसर्च अकॅडेमी’ या संस्थेमार्फत याआधी चार नवीन औषधी शोधण्यात यश आलेले आहे. प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे आपल्या या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील, गुरुजन व औषधनिर्माण तज्ञ चमू ला देतात.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here