चिमूरच्या सदभावना भोजनालय मालकाला पाच हजाराने गडविले , पोलीसात तक्रार

0
104
Advertisements

चिमूरसुरज कुळमेथे

तुम्ही माझी शेती विकून दया मी तुमचे अतिक्रमीत असलेले सदभावना भोजनालय तुमच्या नावाने करून देतो जिल्हाधिकारी यांचेकडे स्वता गैरअर्जदार यांनी अर्ज केला व अर्जावर विचार करत जिल्हाधिकारी यांनी चिमूर उपविभागीय अधिकारी यांचे कडुन अहवाल मागीतला तुमचे नव्वद टक्के काम झाले म्हणुन सदभावना भोजनालय मालक गोपीचंद टेंभूरकर यांना प्रथम पाच हजाराची मागणी केली ती दिली नंतर मोबाईल फोनवर भोजनालय पाडन्याची धमकी, मानसीक त्रास देत पन्नास हजार रूपयांची मागणी करनाऱ्या शेखर जनबंधू एम्प्रेसमिल कॉलनी बेझनबाग नागपूर येथील रहीवासी विरूद्ध चिमूर पोलीसात तक्रार दाखल करन्यात आली.
चिमूर येथील गोपीचंद टेंभूरकर यांची सात नाल्याला लागुन पस्तीस वर्षापासुन अतिक्रमीत जागेवर सदभावना भोजनालय नावाची हॉटेल आहे. सदर अतिक्रमीत हॉटेलच्या जागेचे प्रकरण न्यायालयीन आहे. या अतिक्रमीत जगोचा न्यायनिवाळा लावुन देतो म्हणुन लॉकडानच्या पुर्वी शेखर जनबंधू भोजनालयात ग्राहक म्हणुन आला होता. त्यांनी या जागेची विचारपुस केली व प्रकरण न्यायालयात सुरू असताना स्टे मिळाल्याच्या झेराक्स प्रती मांगीतल्या त्याचा आधार घेवुन चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचेकडे स्वताच शेखर जनबंधु यानीअर्ज केला अर्जावर विचार करत जिल्हाधिकारी यांनी चिमूर उपविभागीय अधिकारी यांना अतिक्रमीत जागेचा अहवाल मागितला याची एक प्रत शेखर जनबंधू यांना देन्यात आली आपल काम झाल समजुन भोजनालय मालक गोपीचंद टेंभूरकर यांना पैशाची मागणी केली.
लॉकडाउनच्या काळात हॉटेल बंद असताना व शेखर जनबंधु यांनी आपली आपबीती सांगत तुमचे अर्ध्य काम झाले अशी लालच दाखवत तुम्ही प्रथम मला पाच हजार दया मी चिमूर ला येत आहे हॉटेल मालकांनी त्यांना पाच हजार रुपये दिले त्यानंतर १३ मे ला रात्री अकरा वाजताच्या दरम्यान मोबाईल फोनवर मॅसेज टाकुन उर्वरीत रक्कम न दिल्यास तुमचे रेस्टारंट तोडन्यासाठी उमरेडवरून बंदोबस्त मागवुन त्याची भरपाई तुमच्याकडुन सक्तीने वसुल करन्यात येईल जप्तीची कारवाई थांबवायची असल्यास वकील सरांच्या अकाउंटला पन्नास हजार टाका, जप्तीची कारवाई अटळ आहे मी भोजनालय जप्तीचा नोटीस काढत आहे, आपले किमंती सामान बाहेर काढुन टाका, कोणत्याही वेळेस कारवाई होवु शकते अशा प्रकारचे मॅसेच टाकत धमकी देत होता.
त्यामुळे भोजनालय मालक गोपीचंद टेंभूरकर यांच्या मानसीकतेला जबर धक्का बसला आहे. शेखर जनबंधु मुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार खंडनीची मागणी करत असते. त्यामुळे शेखर जनबंधु वर कारवाई करून अटक करन्याची मागणी पोलीस तक्रारीत केली आहे. तक्रारीची प्रतिलिपी पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना पाठविन्यात आली आहे. चिमूर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हाची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here