स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त, 1 आरोपी अटकेत

0
190
Advertisements

चंद्रपूर – प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूचा बाजार जिल्ह्यात जोमाने सुरू आहे, कोरोना विषाणूच्या लॉकडाउन काळात सीमाबंदी असून सुद्धा सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात येत आहे.
यावर शिवसेने द्वारे आवाज उचलल्यावर अन्न व औषधी प्रशासनाला जाग आली नव्हती, स्वतः शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या धाडीने लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा पकडल्यावर अन्न व औषध प्रशासन जागे झाले.
शहरातील जटपुरा गेट परिसरात पंकज जुमडे नामक व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत 1 लाख 8 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे संजय अतकुलवार, प्रशांत नागोसे, अमजद खान, मयूर येरने, विनोद जाधव यांनी ती कारवाई यशस्वी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here