फक्त सापडा तुम्ही, मग सांगते कसे अन कोणतं राहते सोशलडिस्टंट….! भीम आर्मीच्या बोरकरचा गडचांदूर CO वर अरेरावी वजा धमकीचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, आडिओ, व्हिडीओ क्लिप व्हायरल, बोरकरांनी सबूत द्यावे, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका CO ची प्रतिक्रिया

0
207
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून शासनप्रशासन अधिकारी व कर्मचारी 24 तास जनतेच्या रक्षणासाठी काम करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.यात नागरिक सुद्धा विविध प्रकारे या युद्धात शासनाला सहकार्य करत आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्यावर ते अतिशय शांतपणे जनतेच्या भावना ऐकुण घेतात जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक हे ही नागरिकांसोबत समाधानपुर्वक बोलतात मात्र गडचांदूर नगरपरिषद येथील मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी ह्या बाबतीत अपवाद ठरल्या आहे.अरेरावी व बेताल वक्तव्य यांचं नेहमीचच झालं असून प्रतिष्ठित वृद्ध डॉक्टर,पत्रकार मग तो कुणीही असो मॅडमला काहिच फरक पडत नसून अरेरावी दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे.डॉक्टर,त्रकार व इतरांना बेताल वक्तव्याचे दर्शन दिल्यानंतर मॅडमनी आता भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांना पाहुन घेण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार बोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून यासंबंधीची आडिओ,व्हिडीओ क्लिप सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
व्हायरल आडिओ,व्हिडिओ प्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील एरिगेशन रेस्ट हाऊसमध्ये काही दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास न.प.चे काही कर्मचारी(पार्टी) मांसाहारी व्यंजनाचा अस्वाद घेत असल्याची माहिती गडचांदूर नगरपरिषदेच्या CO डॉ.विशाखा शेळकी यांना भ्रमणध्वनीवरून भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी दिली असता “ते जेवण करत आहे जेवण” अशी सुरूवात करत मॅडमनी बोरकर यांना चकार शब्द ही न बोलू देता सरळ खडेबोल सुनवत “फक्त सापडा तुम्ही,मग सांगते,कसे राहतेतं,अन कोणतं सोशल डिस्टंट राहतेतं” असे म्हणत “फालतू नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर असे आरोप कराल ना,तर बघून घेईन मी काय कराचे ते” अशी धमकीच दिली.एका महिला अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे वागणूक वजा धमकी मिळाल्याने बोरकर यांना मानसिक धक्का बसला असून याची लेखी तक्रार बोरकर यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडे केली आहे.शासन याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर प्रकरणी मदन बोरकर यांच्या तक्रारीचा PDF,व्हिडिओ आणि CO सोबत संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मिडीवर व्हायरल झाल्याने “ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार याविषयी CO यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नगरपरिषदेत गेले असता भेट झाली नाही.मात्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून CO यांनी अशाप्रकारे प्रतिक्रिया दिली.
————-//———–
जर कर्मचारी यांनी पार्टी केली असेल तर त्याला Proof मागावे तसे फोटो etc.आणि त्यांनी मला ज्यादिवशी phone केला त्यादिवशी आमचा पूर्ण staff with engineer हे barricate बांधत होते रात्री 12 वाजेपर्यंत. याबाबतीत त्याला काय म्हणायचे आहे.”*
परंतु आडिओ क्लिपच्या संभाषणात “ते जेवण करत आहे जेवण” मॅडम असे म्हणत आहे.मग जे कर्मचारी 12 वाजेपर्यंत बैरीकेट बांधत होते ते रेस्ट हाऊसमध्ये जेवण कसेकाय करत असावे.हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here