सुरक्षा किट पोलिसांची, तर पोलीस जनतेची सुरक्षा करणार…अल्का आत्राम, ग्रामीण भागातील पोलिसांना आरोग्य सुरक्षा किटचे वितरण

0
54
Advertisements

पोंभुर्णा – देशात आज कोरोना महामारीमुळे लॉक डाउन सुरू आहे, पोंभुरणा आणि उमरी पोतदार येथील पोलीसांची आरोग्य तपासणी करून त्यांना”आरोग्य सुरक्षा किट लोकनेते आम सुधीर मुनगंटीवार तर्फे देण्यात आली.सर्वस्तरावर गरजवंतांना मदतीचा हात भेदभाव न करता आम. मुनगंटीवार यांनी दिला.लॉक डाउन चा ५२ वा दिवस असतांना त्यांचा मदतीचा ओघ सुरूच आहे. ही बाब प्रेरणादायी असून “आरोग्य सुरक्षा किट पोलिसांची तर पोलीस जनतेची सुरक्षा करेल,असे प्रतिपादन पोंभुरणा पं. स. सभापती अल्का आत्राम यांनी केले.*
*त्या भारतीय जनता पार्टी चंद्रपुर जिल्हा तर्फे पोलीस स्टेशन पोंभुरणा व उमरी पोतदार येथे आयोजित “आरोग्य तपासणी”उपक्रमात पोलिसांना संबोधित करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आज शुक्रवार (१५मे)ला त्या बोलत होत्या.*

*यावेळी पोंभुरणा भाजप तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार,सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड,डॉ प्रतीक गोजे,भाजप नेते डॉ मंगेश गुलवाडे,प्रकाश धारणे,पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.*
*अल्का आत्राम म्हणाल्या,कोरोना संकटात पोलीस जीवावर उदार होऊन,समोर येऊन लढा देत आहे,जनतेची सुरक्षा हेच त्यांचं प्रथम कर्तव्य आहे.लोकनेते आम.मुनगंटीवार यांनी पहिल्या दिवसापासून मदत कार्य सुरू केले.या पूर्वी पोलिसांना स्यानेटाझर व मास्क दिले,आणि आता आरोग्य सुरक्षा किट.त्यांचे हे कार्य जागरूक* *लोकप्रतिनिधी असण्याचे द्योतक आहे.असे त्या म्हणाल्या*
*डॉ गुलवाडे म्हणाले,सरकार च्या पहिले या संकटाची गंभीरता लक्षात घेऊन ,आम मुनगंटीवार यांनी सूक्ष्म नियोजन करून,जनतेला सर्वतोपरी सहकार्य दिले,त्यात पोलिसांचे आरोग्य याचा समावेश आहे.आरोग्य सुरक्षित,तर देश सुरक्षित,कोरोना हारेगा,देश जितेगा असा संदेश त्यानी प्रास्ताविकात दिला.*
*यावेळी प्रकाश धारणे,गजानन गोरंटीवार, पो नि नाईकवाड यांनीही मार्गदर्शन केले*
*संचालन रामकुमार आकापेलिवार यांनी केले.पवन ढवळे यांनी आभार मानले* *यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोंभुरणा येथील ३८ तर उमरी-पोतदार येथील १८ या प्रमाणे ५६ पोलीस* *कर्मचाऱ्यांना “आरोग्य सुरक्षा किट” चे वितरण करण्यात आले*. *यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुरणा डॉ गोजे, आरोग्य सेविक रोशना इटलावार, जयश्री तुम्मे, प्रमोद राठोड,कॅमेरामन विकास गोठे,सैय्यद शफी यांनी परिश्रम घेतले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here