चंद्रपूर जिल्ह्यात मिठासह जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध, अफवा पसरवू नका – तहसीलदार जगदाळे

0
310
Advertisements

(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही – कोरोना या रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्याकरता सध्या देशात व राज्यात लाँकडावून जाहीर केलेला आहे. लाँकडावून काळात नागरिकांनी अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने शासनामार्फत उघडे ठेवण्यात आले आहे . महाराष्ट्र शासन तसेच मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, मीठ इत्यादी वस्तूची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले आहे. परंतु सध्या सिंदेवाही तालुक्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा समाजकंटक नागरिकांमध्ये पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे .
या अफवेला बळी पडून काही नागरिक किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी करून गरज नसताना अधिक प्रमाणात मीठ खरेदी करत असल्याच्या तक्रारी या कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत.
सिंदेवाही तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिठाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांनी मिठा संदर्भात पसरलेल्या कोणत्याही अफवेला बळीन पडता आवश्यक असेल तेवढ्याच मीठ खरेदी करावे .
तसेच सिंदेवाही तालुक्यातील सर्व किराणा दुकानदारांना सुचित करण्यात येते की आवश्यकते पेक्षा जास्त मीठ कोणत्याही ग्राहकाला विक्री करू नये तसेच नागरिकांना चढ्या दराने विक्री होत असेल तर त्यांनी तात्काळ संबंधित दुकानदाराची नाव या कार्यालयात कोरोणा नियंत्रण कक्ष क्र.०७१७८-२८८२४५, जीवनावश्यक वस्तू तपासणी पथकातील पथक प्रमुख एपी सलामे नायब तहसीलदार 94 22 13 75 18 व सदस्य मदन यादव पुरवठा नियंत्रण विभाग , (मो.न.-9049717593), हरीश कोवे (मो.न.-95185 39565)यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करावे. संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
असे सिंदेवाही तालुक्यातील जनतेला तहसीलदार गणेश जगदाळे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here