श्याम कापूस जिनिंगला आग, लाखोंचा कापूस जळून खाक, गोंडपिपरी तालुक्यातील घटना

0
99
Advertisements

गोंडपिपरी:– तालुक्यातील नवेगाव (वाघाडे) येथील स्थित श्याम कापूस जिनिंगला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली असून ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात देशात टाळेबंदी लागू केल्याने कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आली होती. दरम्यान गोंडपिपरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे कापूस घरीच पडून राहील्याने काही दिवसांपूर्वीच शासनाच्या आदेशानुसार कापूस विक्री केंद्रे सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी खरेदी केंद्रावर रांगा लागल्या, दरम्यान आज कापूस खरेदी सुरू असताना गोंडपिपरी तालुक्यातील मौजा नवेगाव (वाघाडे )येथील श्याम जीनिंग मध्ये तब्बल दोन– तीन लाख रुपया पेक्षा अधिक किमतीचा कापूस जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याची चर्चा परिसरात सुरू असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here