चिमूरचे मंजूर झालेले अप्पर जिल्ह्याधिकारी कार्यालय त्वरित सुरू करा, व्यापारी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

0
110
Advertisements

चिमूर तालुका प्रतिनिधी

चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी मागील 40 वर्षांपासून सनदशीर मार्गाने मागणी करीत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर येथील शहीद स्मृती दिन सोहळ्यास नमन करण्यासाठी आले असता चिमूर येथे अप्पर जिल्ह्याधिकारी कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती त्याअनुसघाने ३०एप्रिल २०२० ला चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी पदी निशिकांत सुके यांची नियुक्ती केली तरी १५ दिवस होवूनही अद्यावत कार्यालय सुरू न झाल्याने चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी व्यापारी संघटना चिमूर अध्यक्ष प्रमोद बारापात्रे यांनी जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.

चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती ची मागणी ही गेल्या 40 वर्षीपासून सातत्याने सुरू असताना मात्र आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सुद्धा चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे हेच ध्येय ठेवीत पोषक शासकीय कार्यालये मंजूर करून सुरू केलेली आहेत
16 आगस्ट शहीद दिन सोहळा कार्यक्रमास तत्कालीन मुख्यमंत्री देवेद फडणवीस शहिदाना नमन करण्यासाठी आले असता चिमूर उप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती तेव्हा त्यांच्या शासन काळात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नांनी अप्पर जिल्हाधिकारी सह त्या कार्यालयातील पदे सुद्धा मंजूर झालेली होती .
३०एप्रिल ला राज्य शासनाने चिमूर अप्पर जिल्हाधिकारी पदावर निशिकांत सुके यांची वर्णी लावून अद्यादेश निघाला परंतू जिल्ह्यातील काही विरोधकांनी विरोध करीत चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हलविण्याचा प्रयत्न करून चंद्रपूर ला नेण्याचा कट रचण्यात आला असल्याने मंजूर असलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास विलंब लागत आहे .
चिमूर येथे मंजूर झालेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आलेला आहे .
जिल्ह्याधिकारी याना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात येत असताना चिमूर व्यापारी संघटना अध्यक्ष प्रमोद बारापत्रे ,विनोद शिरपूरकर चंदू कामडी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here