सुगंधित तंबाखूचा 25 लाखांचा साठा जप्त, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हेची धाड

0
33
Advertisements

चंद्रपूर – राज्यात वर्ष 2012 पासून सुगंधित तंबाखू वर प्रतिबंध लावण्यात आला होता, तसे असताना सुद्धा आज राज्यात सुगंधित तंबाकू, गुटखा हे सहज उपलब्ध होत आहे.

देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने सध्या राज्य लॉकडाउन करण्यात आले, या काळात सुद्धा सुगंधित तंबाखूचा साठा चंद्रपूर जिल्ह्यात येत आहे, यावर अजूनही प्रशासनाचे नियंत्रण नाही.

अन्न व औषध विभागातील अधिकाऱ्यांना 14 मे ला शिवसेनेने निवेदन दिले व तात्काळ या प्रतिबंधित वस्तूंचा काळाबाजार थांबवून कारवाई करावी अन्यथा आम्ही धाड मारू असा इशारा दिला होता.

लगेच दुसऱ्या दिवशी पडोली येथील केजीएन ट्रेडर्स च्या गोदामावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व कार्यकर्त्यांनी धाड मारली असता त्या गोदामात 34 बोऱ्यांमध्ये सुगंधित तंबाकू, गुटख्याचा साठा आढळून आला, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली असता पोलीस लगेच उपस्थित होत सदर गोदामातिल साठ्याचा पंचनामा केला, त्या साठ्याची किमंत जवळपास 20 ते 25 लाख रुपये आहे.

महत्वाची बाब म्हणजे सीमाबंदीत हा साठा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आला कसा? पोलिसांच्या नजरेतून हा साठा चुकला कसा याची चौकशी व्हायला हवी.

जिल्ह्यात कुठेही सुगंधित तंबाखू चा व्यापार करणार्याना शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी इशारा दिला आहे, नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, गाठ शिवसेनेशी आहे, जिथे सुगंधित तंबाखु असेल तिथे शिवसेना नक्की पोहचेल.

स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखू चा व्यापार करणारे आरिफ कोलसावाला यांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here