जटपुरा गेट येथील सॅनिटायजर युक्त फवारणी अखेर बंद, पालिकेने यामागचे कारण स्पष्ट करावे – पप्पू देशमुख

0
24
Advertisements

चंद्रपूर – देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असताना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात खबरदारी घेण्यात आली.
त्या अनुषंगाने चंद्रपूर शहरातील काही भागात रसायनयुक्त लिक्विड द्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
शहरातील ऐतिहासिक जटपुरा गेट येथे पालिकेतर्फे सॅनिटायजर युक्त फवारा लावण्यात आला होता, नागरिकांचे कोरोना विषाणू पासून बचाव व्हावा हा एकमात्र उद्देश होता, परंतु कालांतराने तो फवारा सुद्धा बंद करण्यात आला याचे कारण सुद्धा पालिकेने स्पष्टपणे जाहीर केले नसले तरी शहरात मात्र विविध चर्चेला उधाण आले आहे.
कोणतीही रसायनयुक्त फवारणी ही मानवी शरीरावर केल्या जात नाही, मग जेव्हा पालिकेने सॅनिटायजर, रसायनयुक्त फवारणी सरळ जटपुरा गेट येथे लावून नागरिकांवर त्याची फवारणी केली, ही मोठी घोडचूक पालिकेद्वारे झाली, नंतर त्या फवारणीच रूपांतर पाण्यात झाले सर्व रसायनयुक्त लिक्विड काढून त्या टॅंक मध्ये पाणी भरून ते नागरिकांवर पाण्याची फवारणी सुरू करण्यात आली होती.
पालिकेने ज्यावेळी या फवारणी संदर्भात जटपुरा गेट वर फिटिंग केली त्यावेळी त्यांनी कुण्या एक्सपर्ट सोबत चर्चा केली नव्हती का? त्या फवारणीचे दुष्परिणाम नागरिकांच्या शरीरावर काय होणार ते?
याबाबत मनपा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पालिकेने याबाबत स्पष्ट करावे की त्यामध्ये कोणते रसायन वापरले मग तो फवारा का बंद करण्यात आला अशी सूचना यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here